शिक्षकांच्या ऑफलाईन बदल्या करू नयेत, त्यात वशिलेबाजी होईल..

इथे वशिलेबाजी होईल, कुणी सीईओ, अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्र्यांच्या आवडीचा असेल, तर मग इथेल वशिलेबाजीला थारा मिळतो. शिक्षकांचे मोठ्या प्रमाणात शोषण होण्यास देखील जागा मिळते. म्हणून शासानाने शिक्षकांच्या ऑफलाईन बदल्या करण्याचा निर्णय शासनाने मागे घ्यावा, असे माझे स्पष्ट मत आहे.
pankaja munde upset government dissison for teachers transfar news
pankaja munde upset government dissison for teachers transfar news

औरंगाबादः राज्यातील शिक्षकांच्या ऑफलाईन पद्धतीने बदल्या करण्याचा निर्णय आता राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाबद्दल मी तीव्र नापसंती व्यक्त करते. शिक्षक हे लाभाचे पद नाही, ते ज्ञानदानाचे काम करतात. त्यामुळे त्यांच्यासाठी मी ग्रामविकास मंत्री असतांना तेव्हाच्या सरकारने अत्यंत पारदर्शक पद्धतीने ऑनलाईन बदल्यांचा निर्णय घेतला होता.पण आज सरकारने ऑफलाईन बदल्या करण्याचा निर्णय चुकीचा आहे, तो तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी माजी मंत्री भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून केली आहे.

शिक्षकांच्या ऑफलाईन पद्धतीने बदल्या करण्याच्या निर्णयाचे राजकीय पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. युती सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री म्हणून काम केलेल्या माजी मंत्री भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी या निर्णयावर राज्य सरकारव टिका केली आहे. या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करतांनाच त्यांनी यामुळे शिक्षकांचे शोषण, वशिलेबाजी होऊन मोठ्या प्रमाणात गैर प्रकार घडतील अशा इशारा देखील राज्य सरकारला दिला आहे.

सोशल मिडियच्या माध्यमातून आपली नापसंती व्यक्त करतांना पंकजा मुंडे म्हणाल्या, शिक्षकांचे शोषण होऊ नये, वशिलेबाजी होऊ नये, किमान ज्ञानदानाच्या कामात तरी अडथळा निर्माण होऊ नये यासाठी ऑनलाईन बदल्यांचा आधीच्या सरकारचा निर्णय  उपयुक्त ठरला होता. अनेकजण कोर्टात गेले पण न्यायालयाने देखील आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. या कामाचे कौतुक होऊन आपल्याला ॲवार्डही मिळाले होते.

सध्या सर्वत्र कोरोनाचे संकट आहे, या परिस्थितीत राज्य सरकार सर्व गोष्टी आपण आॅनलाई करतो आहोत. त्यामुळे या बदल्या ऑफलाईन करणे अवघड आहे. सर्व डेटा संवर्गाप्रमाणे, मेरिट उपलब्ध करून द्यावा लागेल, शिवाय समुपदेशन करावे लागेल. जर हे ऑफलाईन पद्धतीने झाले तर अशावेळी हजार, बाराशे, अठराशे शिक्षक येऊ शकतात, अशावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळणे अवघड जाईल.

एवढी घाई कशासाठी..

शिवाय इथे वशिलेबाजी होईल, कुणी सीईओ, अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्र्यांच्या आवडीचा असेल, तर मग इथेल वशिलेबाजीला थारा मिळतो. शिक्षकांचे मोठ्या प्रमाणात शोषण होण्यास देखील जागा मिळते. म्हणून शासानाने शिक्षकांच्या ऑफलाईन बदल्या करण्याचा निर्णय शासनाने मागे घ्यावा, असे माझे स्पष्ट मत आहे.

सध्या लॉकडाऊन आहे, शाळा सुरू नाहीत, परीक्षा रद्द करण्यासाठी चर्चा सुरू आहे. त्यामध्ये आताच्या परिस्थितीत इनकम टॅक्स, जीएसटीने सुध्दा आपल्या वसुलीला तीन तीन महिन्यांची मुदतवाढ दिलेली आहे. तेव्हा शिक्षकांच्या बदल्यांसाठी एवढी घाई करण्याची गरज नाही, ते चुकीचे होईल, अशी माझी स्पष्ट भूमिका असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com