ओबीसी आरक्षणः  बीडमध्ये आंदोलनकर्त्यांनी अडवला धुळे-सोलापूर महामार्ग.. - OBC reservation: Dhule-Solapur highway blocked by protesters in Beed. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

ओबीसी आरक्षणः  बीडमध्ये आंदोलनकर्त्यांनी अडवला धुळे-सोलापूर महामार्ग..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 17 जून 2021

ओबीसी समाजाची जनगणना तात्काळ करा, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेतील रद्द केलेले ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा.

बीड ः स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रद्द झालेल्या राजकीय आरक्षणावरून राज्यभरात आंदोलन सुरू झाले आहे. (OBC Reservation) नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी आंदोलनाची घोषणा केल्यानंतर याचे लोण आता इतर जिल्ह्यांमध्ये देखील पसरले आहे.

बीड येथे ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवण्याच्या मागणीसाठी समता परिषदेच्या वतीने धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन करण्यात आले. (OBC reservation: Dhule-Solapur highway blocked by protesters in Beed.) स्थानिक स्वराज्य संस्थेचे रद्द केलेलं आरक्षण पुर्ववत न केल्यास विधान भवनावर पायी मोर्चा काढण्याचा इशारा देखील परिषदेचे सुभाष राऊत यांनी दिला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेचे ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने, बीडमध्ये समता परिषदेसह ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. (Dhole-shlapur National Highway) ओबीसी समाजाची जनगणना तात्काळ करा, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेतील रद्द केलेले ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा, ही मागणी घेऊन बीड - सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग आडवण्यात आला.

समता परिषदेसह ओबीसी बांधवांनी आक्रोश आंदोलन करत अर्धा तास राष्ट्रीय महामार्ग रोखून ठेवला होता. या आंदोलनाला समता परिषदेसह ओबीसी समाजाच्या विविध संघटनातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.  दरम्यान रद्द केलेले आरक्षण तात्काळ पूर्ववत न केल्यास विधान भवनावर मोर्चा काढून, विधान भवनाला घेराव घालू. असा  इशारा समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष राऊत यांनी दिला आहे.

हे ही वाचा ः संसदीय अधिवेशन जुलैच्या उत्तरार्धात होण्याची शक्यता..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख