आता गुन्हेगारांच्या काळजात धडकी भरेल; पोलिस दलात स्कार्पिओ, बोलेरो अन् ८७ मोटारसायकल दाखल..

सुसज्ज अशा स्वरूपाची वाहने उपलब्ध झाल्याने पोलिस गुन्ह्यांचा तपास जलदगतीने करतील. गुन्ह्यांवर नियंत्रण आणतील.
Guardian Minister Subhash Desai News Aurangabad
Guardian Minister Subhash Desai News Aurangabad

औरंगाबाद :  ग्रामीण पोलिस दलामध्ये जिल्हा नियोजन व विकास निधीतून सहा स्कार्पिओ, ८७ मोटारसायकल आणि सात बोलेरोंचा समावेश झाला आहे. या वाहनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमता, गतिमानतेत अधिक वाढ होईल आणि गुन्हेगारांच्या काळजात धडकी भरेल,असा विश्वास उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. (Now the grief of criminals will be shocking; Scorpio, Bolero and 87 motorcycles were registered in the police force.) जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या गोकुळ स्टेडिअमवर पालकमंत्री देसाई यांच्याहस्ते वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.

पोलिस दलातर्फे डायल ११२ प्रकल्पातील वाहने, महिला बीट मार्शल, आरसीपी प्लॅटून यांच्या पथसंचलनास पालकमंत्री देसाई यांनी हिरवा झेंडा दाखवून वाहनांचे लोकार्पण केले. (Gaurdian Minister Subhash Desai) जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगीन विकासाला प्राधान्य देण्यात येते.  यातून विविध योजनांना मंजुरी देण्यात येते. यापूर्वी शहर पोलिसांसाठी देखील वाहने उपलब्ध करून देण्यात आली.

आता ग्रामीण भागातील पोलिस दलास वाहने उपलब्ध करून देण्यात आल्याने संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांच्या गस्तीने गुन्हेगारांच्या काळजात धडकी भरेल. (Disciplined citizens will be relieved) तसेच शिस्तप्रिय नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला. गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी वाहनांचा अधिक उपयोग होईल. विशेषत: ग्रामीण भागातील महिलांवरील होणाऱ्या गुन्ह्यांवर महिला बीट अंमलदारांमुळे वचक बसेल.

सुसज्ज अशा स्वरूपाची वाहने उपलब्ध झाल्याने पोलिस गुन्ह्यांचा तपास जलदगतीने करतील. गुन्ह्यांवर नियंत्रण आणतील, असेही ते म्हणाले.  कोरोना काळात पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुकही देसाई यांनी केले. जिल्हा पर‍िषदेच्या अध्यक्ष मीनाताई शेळके, खासदार डॉ.भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे,  रमेश बोरनारे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस महानिरीक्षक के.एम. प्रसन्ना, जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती.

Edited By : Jagdish Pansare


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com