यापुढे राज्यात काॅंग्रेसच नंबर वन, मुख्यमंत्रीही आपलाच..

मुख्यमंत्र्यांचा अपमान करण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाही. याबाबत योग्य आणि कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.
Congress leader Nana Patole News Nanded
Congress leader Nana Patole News Nanded

नांदेड ः काॅंग्रेसच्या विचारांचे महाराष्ट्र राज्य आहे. त्यामुळेच पक्षातर्फे संघटना बांधणीचे काम सुरू आहे. आगामी काळात काॅंग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष राज्यात बनणार असल्यामुळे काॅंग्रेसचाच मुख्यमंत्री होईल, असा दावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. (From now on, Congress is number one in the state, the Chief Minister is also ours. Said Nana Patole)

नांदेडात आयोजित व्यर्थ न हो बलिदान या कार्यक्रमातंर्गत स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्यात आला. (Minister Ashok Chavan) त्याचबरोबर नांदेडसह परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडल्यानंतर पटोले पत्रकारांशी बोलत होते.

काॅंग्रेस पक्षातर्फे नव्या पिढीला स्वातंत्र्याची माहिती व्हावी, या दृष्टीकोनातून हा कार्यक्रम राज्यभर घेण्यात येत आहे. (Congress State President Nana Patole Maharashtra) विभागीय पातळीवर हे कार्यक्रम झाले असून आता जिल्हा पातळीवर घेण्यात येणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.

भाजपने संपूर्ण देशच विकायला काढला आहे, त्यामुळेच काॅंग्रेसने ही चळवळ सुरू केली आहे. देशाचा जीडीपी आणि आर्थिक स्तर बिघडत चालला असून पंतप्रधान मोदी याबाबत काहीच बोलायला तयार नाहीत. देशात तिरंगा ध्वजाचा अपमान केला जात असून हा देशद्रोहच असल्याचे पटोले म्हणाले. 

ही महाराष्ट्राची संस्कृती नाही

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्याबाबत केलेले वक्तव्य चुकीचे आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राणेंची वाक्यरचना ऐकल्यानंतरच काॅंग्रेसतर्फे निषेध करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांचा अपमान करण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाही. याबाबत योग्य आणि कायदेशीर कार्यवाही करण्यात येत असून महाराष्ट्रातही पश्चिम बंगालसारखी अशांतता पसरविण्याचा काही जणांचा प्रयत्न असून तो होता कामा नये, असेही पटोले म्हणाले.

यावेळी कॉँग्रेसचे राज्य प्रभारी एच. के. पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, समन्वयक विनायक देशमुख, माजी मंत्री डी. पी. सावंत, जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, महानगराध्यक्ष आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, महापौर मोहिनी येवनकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, प्रवक्ते संतोष पांडागळे आदी उपस्थित होते.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com