latur medical college dean notice news
latur medical college dean notice news

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या शहरातील मेडीकल काॅलेजच्या अधिष्ठातांंना नोटीस

कोविड उपचारासाठी आवश्यक असलेले Tossilizumab हे महागडे औषध लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयातील रुग्णास बाजारातून विकत आणण्यास सांगण्यात आले.
 

मुंबईः  लातूर येथील विलासराव  देशमुख शासकीय वैद्यकीय  विज्ञान संस्थेच्या  रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णाला महागडे औषध बाहेरून आण्याचीची शिफारस केल्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण संचालकांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

राज्यात कोविड  विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक रुग्ण उपचारासाठी येत आहेत. या सर्व रुग्णांवर शासकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.  मात्र असे असूनही  कोविड उपचारासाठी  आवश्यक असलेले Tossilizumab हे महागडे औषध लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयातील रुग्णास बाजारातून विकत आणण्यास सांगण्यात आले. या कारणावरून शिक्षण संचालकांनी अधिष्ठातांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

लातूर येथे घडलेली ही बाब अतिशय गंभीर असून शासनाच्या आदेशाचे आणि धोरणाचे उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे अधिष्ठाता यांच्याविरुद्ध साथरोग अधिनियम तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियमा नुसार  शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये याचे स्पष्टीकरण तीन दिवसात मागण्यात आले आहे.

या घटनेमुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या संबंधित रुग्णाची गैरसोय झाली असून अशा घटना पुनश्च घडणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले असून या रुग्णावरील उपचाराचा सर्व खर्च शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार शासनामार्फतच करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com