महाविकास आघाडी सरकार हे बोलघेवडे नाही, तर काम करणारे..

रोनासोबत लढा देत असतानाच मराठवाड्याच्या विकासासाठी अनेक कामांची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.
cm udhav thackeray news aurangabad
cm udhav thackeray news aurangabad

औरंगाबादः राज्यातील आघाडी सरकार केवळ घोषणा करणारे, नव्हे तर प्रत्यक्षात कामे करणारे आहे. ज्या कामांचे भूमिपूजन झाले त्याचे लोकार्पण होणारच. बोलघेवडे सरकार काही कामाचे नाही. (Not just an announcement, a working lead government) ज्यांनी मला विकास कामांबद्दल धन्यवाद म्हणून बोर्ड दाखविले त्यांनी खरा विकास अजून पाहिलेलाच नाही, रस्ते झाले हाच जर तुमच्यासाठी विकास असेल तर तुमचा विकास तुम्हाला लखलाभ. आमचा विकास आता तुम्ही बघणार आहात, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शुक्रवारी (ता. १७) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.( Chief Minister Uddhav Thackeray Maharashtra) यावेळी ठाकरे म्हणाले, जुलमी निजामाच्या विरोधात लढा देऊन मराठवाडा काही अपेक्षेने देशात सहभागी झाला.

७५ वर्षात सगळ्या अपेक्षा पूर्ण झाल्या असे नाही. सरकार गेल्या दीड वर्षांपासून काम करत आहे. (Marathwada Mukti sangaram Day, Aurangabad) कोरोनासोबत लढा देत असतानाच मराठवाड्याच्या विकासासाठी अनेक कामांची मुहूर्तमेढ रोवण्यात आली, असे सांगून त्यांनी कामांची यादी वाचून दाखविली.

ही यादी पाहून काही जण म्हणतील की, मुख्यमंत्री आले कामांची यादी वाचून गेले. पण आघाडी सरकार केवळ घोषणा करणारे नाही तर कामे करणारे आहे. कामांच्या घोषणा झाल्या पुढे काय तर, पुढे या कामांचे लोकार्पण होणार, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.  कामे झाल्यामुळे अनेकांनी मला धन्यवाद देणारे फलक लावले आहेत.

काहींनी फुले उधळली, पण केवळ रस्त्यांची कामे म्हणजे तुमच्यासाठी विकास आहे का? असा टोला त्यांनी एमआयएमला लगावला. मराठवाडा ही संतांची, विरांची भूमी आहे. संतभूमी म्हणून पैठणला संतपीठ सुरू होत आहे. हे संतपीठ केवळ प्रेक्षणीय स्थळ न होता जागतिक दर्जाचे विद्यापीठ व्हावे, जगातील अभ्यासकांनी याठिकाणी आले पाहिजे, अशी अपेक्षाही ठाकरे यांनी व्यक्त केली.

निजामाच्या खुणा पुसून टाकू

निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त झाला पण आजही निजामकालीन १५० शाळा आहेत. ही मराठवाड्याची वैभव सांगणारी परंपरा होऊ शकत नाही. त्यामुळे या खुणा पुसून टाकण्यासाठी शाळांचा पुर्निवकास करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, या शाळा पाहून अभिमान वाटला पाहिजे, असे ठाकरे यांनी सांगितले.

मराठावाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला खासदार इम्तियाज जलील यांनी पहिल्यांदाच हजेरी लावली. आमदार असताना चार वर्षे व खासदार झाल्यापासून इम्‍तियाज जलील स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करत नसल्याने त्यांच्यावर टीका केली जात होती.

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली कामांची यादी

एमआयएमच्या उपरोधिक स्वागताला मुख्यंत्री उद्धव ठाकरे  यांनी सडेतोड उत्तर दिले. मराठवाड्यात केलेल्या कामांची यादीच त्यांना वाचून दाखवली. यात औरंगाबाद, परभणी, हिंगोली, उस्मानाबादसह मराठवाड्यात सुरू असलेल्या समृद्धी महामार्गासह इतर विकासकामांची जंत्रीच मांडली.
  
-औरंगाबाद-अहमदनगर रेल्वे मार्गाला चालना
-औरंगाबाद-शिर्डी हवाई सेवेची चाचपणी
-सातारा-देवळाई भागात भूमिगत मलनि:सारणासाठी ३८२ कोटी रुपये
-शहरातील मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ३१७. २२ कोटी रुपये
-शहरातील १६८० कोटींच्या पाणी पुरवठा योजना
-सफारी पार्क जगातले वैशिष्ट्यपूर्ण करणार
-औरंगाबाद-शिर्डी या ११२. ४० किलो मीटर मार्गाची श्रेणीवाढ
-बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतीवन
-शहरातील गुंठेवारी नियमित करणे
-घृष्णेश्वर मंदिर सभामंडप विकास. वाढीव २८ कोटी रुपये खर्च  

परभणी
-शहरात भुयारी गटार योजनेच्या कामासही गती. ३५० कोटी रुपयांची तरतूद
-जल जीवन अभियानातून अतिरिक्त पाणी पुरवठा योजना. १०५ कोटी रुपये

हिंगोली

-दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी ६ कोटी निधी
-हिंगोली येथे हळद प्रक्रिया उद्योग. ४.५० कोटी
-औंढा नागनाथ मंदिर परिसराचा विकासासाठी ८६.१९ कोटी.
-नरसी नामदेव मंदिर परिसराच्या विकासाठी ६६.५४ कोटी.

उस्मानाबाद
१६८.६१ कोटीची भूमीगत गटार योजना

इतर कामे
-समृद्धीला जोडणाऱ्या १९४.४८ किलोमीटरच्या जालना- नांदेड महामार्गाला देखील गती देणार
-मराठवाड्यात येत्या वर्षात जवळपास २०० मेगावॅटचा सौर प्रकल्प उभारणार

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com