खैरेंमुळे नाही, तर शिवसेना-भाजप युतीमुळे कराड नगरसेवक, महापौर झाले होते..

शिवसेनेने तेव्हा भाजपचा उपमहापौर करू असा शब्द दिला होता, पण तो पाळला नाही.
Bjp reaction on Shivsena Leader Khaires Reaction News Aurangabad
Bjp reaction on Shivsena Leader Khaires Reaction News Aurangabad

औरंगाबाद ः केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ.भागवत कराड हे दोनवेळा नगरसेवक, एकदा उपमहापौर, दोनदा महापौर झाले ते खैरे यांच्यामुळे नाही, तर शिवसेना-भाजपची तेव्हा युती होती. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आणि मुंबईतील शिवसेनेचे नेते महापालिकेतील सत्तेतील पदांचा निर्णय घ्यायचे. (Not because of Khaire, but because of Shiv Sena-BJP alliance, Karad became councilor, mayor) नेत्यांमध्ये जे ठरत होते त्याची अंमलबजावणी महापालिकेत व्हायची. त्यामुळे कराड यांना मी नगरसेवक, महापौर केले हा खैरे यांचा दावा धादांत खोटा असल्याच्या प्रतिक्रिया भाजपमधून उमटत आहेत.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी एका मुलाखतीत केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांना आपणच नगरसेवक आणि दोनवेळा महापौर केल्याचा दावा केला. ( Central State Fianance Minister Dr.Bhagwat Karad) यावर स्वतः कराड यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली.

त्यानंतर भाजपमधील अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी खैरे यांचा हा दावा खोटा असल्याचे सांगत कराड यांना केंद्रात मिळालेली म्हत्वाची जबाबदारी, अर्थ राज्यमंत्री पद खैरेंच्या डोळ्यात खूपत असल्याचा आरोपही केला. (Shivsena Leader Chandrakant Khaire, Marathwada)

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांना मी नगरसेवक आणि दोनवेळा महापौर केले, असा दावा करत त्यांना  भेटायला कशाला जाऊ, असे विधान शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी नुकतेच केले होते. (Ex Deputy Mayor Sanjay Joshi,Bjp, Aurangabad)  खैरेंच्या या विधानावर भाजपमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. भाजपचे माजी महापौर संजय जोशी यांनी खैरे यांचा कराड यांच्या नगरसेवक, उपमहापौर आणि महौपार करण्यात कुठलाच रोल नाही.

महापालिकेत शिवसेना-भाजपची युती होती. डाॅ.कराड हे पहिल्यांदा १९९५ मध्ये समतानगर वार्डातून अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांनतर वर्षभरातच तत्कालीन उपमुख्यमंत्री व भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

पुन्हा दुसऱ्यांदा कराड त्याच वार्डातून नगरसेवक झाले, पण भाजपच्या तिकीटावर. तेव्हा महापालिकेत भाजपचे सात नगरसेवक होते, कराडांच्या भाजप प्रवेशामुळे आमची संख्या आठ झाली होती.

तेव्हा शिवसेनेच्या महापौर सुनंदा कोल्हे यांना आम्ही कुठल्याही पदाची अपेक्षा न बाळगता मतदान केले. शिवसेनेने तेव्हा भाजपचा उपमहापौर करू असा शब्द दिला होता, पण तो पाळला नाही. त्यानंतर डाॅ.कराड यांना पक्षाकडून उपमहापौर आणि दोनवेळा महापौर होण्याची संधी मिळाली ती युतीच्या नेत्यांनी ठरवलेल्या फाॅर्म्युल्यानूसारच होती.

कराड मंत्री झाल्यामुळे पोटदुखी..

खैरेंचा जर कराडांच्या बाबतीत असा दावा असेल, तर आतापर्यंत शिवसेनेचे झालेले महापौर आमच्यामुळे झाले असा दावा एखाद्या भाजपच्या नेत्याने केला तर तो मान्य होईल का? असा प्रश्न देखील निर्माण होतो.

त्यामुळे कराड यांना मी नगरसेवक, महापौर केले या खैरे यांच्या दाव्यात तथ्य नाही, असेही जोशी म्हणाले. शिवसेनेने आम्हाला साथ दिली हे एकवेळ मान्य करू, पण कुणी जर मी नगरसेवक केले, महापौर केले  असे म्हणत असेल तर तो त्यांचा खोटा अंहकार आहे, असा टोला देखील त्यांनी खैरे यांना लगावला. मराठवाड्यातील पहिले बाल शल्यचिकित्सक असलेले डाॅ. भागवत कराड हे उच्चशिक्षत आहेत.

देश पातळीवरील नेतृत्वाने त्यांच्या विश्वास दाखवत एवढी मोठी संधी दिला याचा आम्हाला अभिमान आहे. केंद्रात अर्थ राज्यमंत्री पदाची डाॅ. कराड यांना मिळालेली संधी ही खरी खैरे यांची पोटदुखी आहे? असा चिमटा देखील जोशी यांनी काढला. दरम्यान कराड यांनी एका कवितेचा आधार घेत खैरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com