महापालिकेवर भगव्याशिवाय दुसरा कुठलाच झेंडा फडकू शकत नाही, एमआयएमने स्वप्न पाहू नये..

लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतच जिल्ह्यातील जनतेने शिवसेनेचे सगळे आमदार निवडून देत औरंगाबाद शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे, हे दाखवून दिले आहे.
Shivsena Leader Chandrakant Khaire Reaction News
Shivsena Leader Chandrakant Khaire Reaction News

औरंगाबाद ः हे शहर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारे आहे. त्यांचे विचार हिंदुत्ववादी जनतेपर्यंत पोचवणारे आम्ही सेवेकरी आहोत. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेवर भगव्याशिवाय इतर कुठलाही झेंडा फडकणे शक्य नाही, हिरवा तर मुळीच नाही. एमआयएमने स्वप्न पाहू नये, असा टोला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी खासदार इम्तियाज जलील यांना लगावला. (No other flag can fly on the Municipal Corporation except saffron, MIM should not dream.)

औरंगाबाद महापालिका निवडणूका येत्या सहा महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने सगळेच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. (Shivsena Leader Chandrakant Khaire) लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा पराभव करत एमआयएमने विजय मिळवल्यानंतर या पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. (AIMIM Mp Imtiaz Jalil) यातूनच इम्तियाज जलील यांनी जसा औरंगाबादने एमआयएमला महाराष्ट्रातून पहिला खासदार निवडून दिला, तसाच आता महापालिकेचा पुढचा महापौर देखील आमचाच होईल, असा दावा केला होता.

यावर शिवसेनेकडून तिखट प्रतिक्रिया आली आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे `सरकारनामा`शी बोलतांना म्हणाले, गेल्या २५ वर्षांपासून महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकतो आहे. लोकसभा निवडणूकीत काही लोकांच्या चुकीमुळे हिरवा झेंडा फडकला. पण त्यामुळे एमआयएमने हुरळून जाऊ नये. त्यांच्या भ्रमाचा भोपळा महापालिका निवडणूकीत शिवसेना फोडल्याशिवाय राहणार नाही.

हो शिवसेनेचा बालेकिल्लाच..

लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतच जिल्ह्यातील जनतेने शिवसेनेचे सगळे आमदार निवडून देत औरंगाबाद शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे, हे दाखवून दिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे हे आवडते शहर आहे. त्यांनी कायम इथल्या जनतेवर प्रेम केले आणि आपणही त्यांच्या विचारांवर मार्गक्रमण करत आहोत. शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे हे राज्याची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळात आहेत. विशेषतः कोरोना काळात ज्या पद्धतीने त्यांनी परिस्थिती हातळली ती पाहता लोकांचा त्यांच्यावरील विश्वास अधिक बळकट झाला आहे.

त्यामुळे एमआयएम किंवा इम्तियाज जलील यांनी कितीही दावे केले, तरी त्यांचे स्वप्न कधीही पुर्ण होणार नाही, शिवसैनिक ते पुर्ण होऊ देणार नाही. महापालिकेवर शिवसेनेचा भगवा होता, आहे, आणि यापुढेही कायम राहील, असा विश्वासही खैरे यांनी व्यक्त केला. महापालिकेवर हिरवा झेंडा फडकवण्याचे स्वप्न कुणी पाहू नये,  ते कदापी शक्य नाही, याचा पुनरुच्चार देखील त्यांनी केला. शिवसेना ताकदीने कामाला लागली आहे, असेही त्यांनी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com