माझी देशमुखी तर कोणी काढून घेणार नाही ना...

लातूरमधून पुन्हा निवडणूक लढवण्याची इच्छा जेव्हा विलासरावांनी बोलून दाखवली तेव्हा वातावरण चांगले नाही, तुम्ही पुन्हा निवडणूक लढवू नका असे त्यांना सांगितले जात असे. लातूरचा इतिहासही तसाच होता.
vilasrao deshmukh and bedre latur news
vilasrao deshmukh and bedre latur news

लातूरः विलासराव देशमुख राजकारणातील एक दिलखुलास व्यक्तीमत्व. विकास कामे करतांना कधी पक्षभेद केला नाही, की कुणाबद्दल मनात कायम कटूता ठेवली नाही. राजकारणात काम करत राहयचं, विजय-पराभव याचा फारसा त्यांनी कधी विचार केला नाही. १९९५ मध्ये विलासराव देशमुखांचा एकदाच पराभव झाला, त्यानंतर पुन्हा लातूरमधून लढण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा तुमचा पुन्हा पराभव होईल, वातावरण चांगले नाही, तुम्ही निवडणूक लढवू नका, असा सल्ला देणाऱ्यांना  विलासरांवानी माझा पराभव होईल, पण माझी देशमुखी तर कोणी काढून घेणार नाही ना? असा टोला लगावला होता..

विलासराव देशमुख राजकारणातील एक दिलखुलास व्यक्तीमत्व. विकास कामे करतांना कधी पक्षभेद केला नाही, की कुणाबद्दल मनात कायम कटूता ठेवली नाही. राजकारणात काम करत राहयचं, विजय-पराभव याचा फारसा त्यांनी कधी विचार केला नाही. हजरजबाबीपणा हा विलासरावांचा विशेष गुण. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या या गुणाचा अनुभव अनेक राजकारण्यांना आलेला आहे.

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी १९८० मध्ये विधानसभेची पहिली निवडणूक लढवली. या निवडणुकीपासून मी त्यांच्या सोबत कार्यकर्ता म्हणून काम केलेले आहे. संपर्क वाढत गेला आणि कालांतराने मी त्यांच्या कायदेशील सल्लागारही झालो. विलासरावांच्या सर्व निवडणुकींचा साक्षीदार त्या निमित्ताने मला होता आले.  विलासरावांचा पराभव होईल असे कोणालाही वाटत नव्हते. पण १९९५ मध्ये त्यांना पराभवाचे तोंड पहावे लागले. एखाद्या राजकारणासाठी पराभव पचवणे एवढे सोपे नसते. 

पण विलासराव देशमुख मात्र याला अपवाद होते. पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता, पण म्हणून पुन्हा निवडणूक लढवायचीच नाही असे काही त्यांनी ठरवले नव्हते. पुढच्या निवडणूकीत पुन्हा मैदानात उतरायचे आणि जिंकून यायचे याची तयारी विलासरावांनी सुरू केली होती. आपला पराभव कशामुळे झाला? नेमकी काय चूक झाली याची ते चर्चा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत नेहमी करायचे. खरे तर त्यांची चकू नव्हती, पराभवाची कारणे वेगळीच होती. लातूरमधून पुन्हा निवडणूक लढवण्याची इच्छा जेव्हा विलासरावांनी बोलून दाखवली तेव्हा वातावरण चांगले नाही, तुम्ही पुन्हा निवडणूक लढवू नका असे त्यांना सांगितले जात असे. लातूरचा इतिहासही तसाच होता.

बाबासाहेब परांजपे, केशवराव सोनवणे एकाद पराभूत झाल्यानंतर पुन्हा पुढे आले नाहीत. पण त्याला विलासराव अपवाद ठरले. पराभवातून ते सावरले, जिद्दीने पुन्हा उभे राहिले, औसा, दिंडोरी सारख्या ठिकाणाहून उमेदवारीची मागणी येत असताना त्यांनी ती नाकारली. लातूरमधूनच निवडणूक लढण्याची तयारी त्यांनी केली. माझा पराभव झाला तरी माझी देशमुखी तर कोणी काढून घेणार नाही ना? असे ते मला नेहमी सांगत असे. त्यांची जिद्द कामाला आली. इतिहासात पहिल्यांदाच ते सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले. केवळ विजयी झाले असे नाही, तर राज्याचे मुख्यमंत्री झाले. लोकाबाबत कणव असल्याने ते लोकनेते होवू शकले.

(शब्दांकनः हरी तुगांवकर)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com