पीएम केअरच्या व्हेटिंलेटरमध्ये दोष नाही, परभणी कोविड सेंटरचे काम त्यावरच सुरू

जिल्हा प्रशासनाने म्युकरमायकोसिसचे रुग्ण शोधले पाहिजे,त्या रुग्णांना तात्काळ वैद्यकीय उपचार मिळण्याकरिता सर्वार्थाने प्रयत्न केले पाहिजे.
Devendra fadanvis press  news parbhani
Devendra fadanvis press news parbhani

परभणी ः पीएम केअर फंडातून राज्यात व मराठवाड्यात देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरवरून बरेच वादंग सुरू आहे. विरोधकांनी हे व्हेंटिलेटर नादुरूस्त आणि निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी लावून धरली होती. (No fault in PM Care's ventilator, Parbhani Covid Center works on it, Said Devendra Fadanvis) दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा पीएम केअर व्हेंटिलेटरमध्ये दोष नसल्याचा दावा केला आहे. परभणी येथील कोविड सेंटरचे काम याच व्हेंटिलेटरवर सुरू असल्याचे आपल्याला येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे फडणवीस म्हणाले

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील कोरोना केअर सेंटर व जिल्हा रुग्णालयांना भेटी देऊन फडणवीस तेथील व्हेंटिलेटरचा आढावा घेत आहेत.  फडणवीस काल परभणी जिल्हा दौऱ्यावर होते. (He visited the Kovid Center in the new Zilla Parishad building.) जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीतील कोविड सेंटरला त्यांनी भेट दिली. या सेंटरमधील आयसीयू कक्षात भरती असलेल्या कोरोना बाधित रुग्णांची विचारपुस केली. वैद्यकीय उपचार, औषधी तसेच अन्य सुविधाची त्यांनी पाहाणी केल्यानंतर  येथील ऑक्सीजन प्लॅन्टची देखील त्यांनी पाहणी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोविडचा आढावा घेतला. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले 'पीएम' केअर फंडातून परभणी जिल्हयासाठी आलेल्या व्हेन्टीलेटर मध्ये दोष नाही. त्यावरच या ठिकाणचे काम सुरु आहे. अशी माहिती येथील आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी व तज्ञ डॉक्टरांनी मला दिली आहे. शहरासह जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसचे रुग्ण जिल्हा प्रशासनाने शोधून काढावेत. परभणी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता खाली आली आहे. त्याबद्दल आपण समाधानी आहोत.

पहिल्या व दुस-या टप्प्यात या जिल्ह्यात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. विशेषतः मृत्यूचे प्रमाण देखील चिंता वाढवणारे होते. आता जिल्हा प्रशासनाने म्युकरमायकोसिसचे रुग्ण शोधले पाहिजे, त्या रुग्णांना तात्काळ वैद्यकीय उपचार मिळण्याकरिता सर्वार्थाने प्रयत्न केले पाहिजे, अशी अपेक्षाही फडणवीस यांनी व्यक्त केली.  

कोरोनाबाधितांची रुग्ण संख्येचा दर पाचच्या खाली आणला पाहिजे तरच स्थिती नियंत्रणात येईल, असे सांगतानाच सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्यासह आमदार मेघना बोर्डीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, डॉ. सुभाष कदम आदींची उपस्थिती होती.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in