नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही..

अधिकाधिक भरपाई महाविकास आघाडी सरकारकडुन मिळवुन देण्यासाठी मी व माझे सहकारी प्रयत्नशिल राहतील.
Gardiaun Minister Dhnanjay Munde Beed News
Gardiaun Minister Dhnanjay Munde Beed News

बीड: जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला असुन आष्टी तालुक्यातील काही महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. (No affected farmer will be deprived of help. Said Minister Dhnanjay Munde) या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे आज सकाळपासून बीड जिल्ह्यात पाहणी केली.

आष्टी तालुक्यातील मराठवाडी गावापासून दौऱ्याला सुरुवात झाली.  नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, (Heavy Rain in Beed district) असा विश्वास मुंडे यांनी मराठवाडी गावकऱ्यांशी संवाद साधताना दिला.

आष्टी तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या मराठवाडी, शेडाळा, देऊळगावघाट, सावरगांव, गंगादेवी या गावांची पाहणी करताना शेतातून पिके वाहुन गेलेल्या बाजरी, सोयाबीन आदी पिकांची मुंडे यांनी पाहणी केली.

धंनजय मुंडे शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले, आता नुकसानीचे पुर्वी प्रमाणे पंचनामे न करता महसुल, कृषी व विमा कंपनीचे असे तिनही अधिकारी संयुक्तपणे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करतील. (Gardiuan Minister Dhnanjay Munde Beed)  त्यानुसार अधिकाधिक भरपाई महाविकास आघाडी सरकारकडुन मिळवुन देण्यासाठी मी व माझे सहकारी प्रयत्नशिल राहतील.

यावेळी गंगादेवी येथील तुटलेला रस्ता,  सावरगाव येथील छोट्या नदीच्या पुरामुळे झालेले नुकसान यांची देखील पाहणी करण्यात आली.  गंगादेवी येथील गावकऱ्यांच्या मागणीनुसार रस्त्याच्या पुनर्बांधणी  कामासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुंडे यांनी संबंधितांना दिले.

यावेळी आमदार बाळासाहेब आजबे, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, उपविभागीय अधिकारी रमेश मुडलोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जेजुरकर, माजी  आमदार साहेबराव दरेकर,तहसीलदार राजाभाऊ कदम, डॉ. शिवाजी राऊत, सतिश शिंदे, अण्णासाहेब चौधरी, शिवाजी डोके, महादेव डोके, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे याच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in