नितीन पाटीलच अध्यक्ष म्हणणाऱ्या सत्तारांची पलटी; संचालक मंडळ ठरवेल तोच अध्यक्ष

बॅंकेचे माजी अध्यक्ष नितीन पाटील हे निवडूण आले असून नवे संचालक मंडळा पुर्वी ठरल्याप्रमाणे त्यांनाच अध्यक्ष करणार का? अब्दुल सत्तार नितीन पाटील यांना दिलेला शब्द पाळणार का?
Aurangabad District Bank Election News
Aurangabad District Bank Election News

औरंगाबादः जिल्हा बॅंक निवडणुक शिवसेना- राष्ट्रवादी व भाजप या तीन पक्षांनी मिळून शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून लढवली. वीस पैकी चौदा जागा जिंकत या पॅनलने दणदणीत विजय मिळवला. तर विरोधी पक्ष काॅंग्रेसच्या शेतकरी सहकार बॅंक पॅनलला पाच जागांवर समाधान मानावे लागले. पॅनलची घोषणा झाली तेव्हापासून बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील असतील असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार व शेतकरी विकास पॅनलच्या अन्य नेत्यांनी जाहीर केले होते. परंतु बॅंकेवर सत्ता येताच सत्तारांनी पलटी मारल्याचे चित्र पहायला मिळाले. नितीन पाटील हेच बॅंकेचे अध्यक्ष व्हावेत, अशी माझी अपेक्षा आहे, पण संचालक मंडळ ठरवतील तोच अंतिम निर्णय असेल असे सांगत सत्तारांनी पाटलांची धाकधुक वाढवली आहे.

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक यावेळी चांगलीच चर्चेत आली. राज्याच्या सत्तेत विरोधी पक्ष असलेल्या भाजपला सोबत घेतल्यामुळे शिवसनेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी आपल्याच पक्षाचे मंत्री भुमरे, सत्तार व आमदार अंबादास दानवे यांच्यावर तोफ डागली होती. मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणणाऱ्या भाजपला सोबत का घेतले? असा सवाल करत त्यांनी काॅंग्रेसला पाठिंबा दर्शवला होता. यावरून जिल्ह्यात खैरे विरुद्ध भुमरे, सत्तार, दानवे असे चित्र निर्माण झाले होते.

परंतु भाजप सोबत आघाडी करून लढलेल्या जिल्हा बॅंकेवर भविष्य़ात शिवसेनेचे वर्चस्व राहणार हे स्पष्ट झाले आहे. जिल्हा बॅंकेवर गेली अनेक वर्ष संचालक म्हणून काम करत असलेले आणि शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख नेते आमदार हरिभाऊ बागडे यांचा पराभव झाल्यामुळे आता बॅंक पुर्णपणे शिवसेना म्हणजेच सत्तार, भुमरे आणि दानवे यांच्या हातात गेल्याचे चित्र आहे. बॅंकेचे माजी अध्यक्ष नितीन पाटील हे निवडूण आले असून नवे संचालक मंडळा पुर्वी ठरल्याप्रमाणे त्यांनाच अध्यक्ष करणार का? अब्दुल सत्तार नितीन पाटील यांना दिलेला शब्द पाळणार का? याकडे

आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

भुमरेंची गुगली, सत्तारांचा षटकार..

शेतकरी विकास पॅनलने २० पैकी १४ जागा जिंकत जिल्हा बॅंक ताब्यात घेतली आहे. विरोधी पॅनलला पाच जागा मिळाल्या तर एक अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. विजयानंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना भुमरे-सत्तार यांनी अध्यक्षपदावरून वेगवेळी विधान केली. त्यामुळे सहाजिकच त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या नितीन पाटलांची मात्र घालमेल झाली. बॅंकेचा अध्यक्ष कोण? असेल या पत्रकारांच्या प्रश्नावर भुमरे यांनी गुगली टाकत चेंडू सत्तारांकडे टोलावला. भुमरे म्हणाले, अध्यक्ष कुणाला करायचे हे सगळे सत्तारांनी ठरवले आहे, तेच आमचे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी नितीन पाटील यांना अध्यक्ष केले, किंवा ते स्वतः अध्यक्ष झाले तरी आमची काही हरकरत नाही.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com