औरंगाबाद जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील बिनविरोध

जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटीलच असणार हे जवळपास निश्चित होते. आज निवडणूकीच्या औपचारिकतेनंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले.
Nitin Patil Chairmain Aurangabad District Bank News
Nitin Patil Chairmain Aurangabad District Bank News

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष पदी अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे नितीन पाटी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दोन दिवसांपुर्वीच नितीन पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला होता. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी-भाजप शेतकरी विकास पॅनलला २० पैकी १४ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर आज अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली.

अध्यक्षपदासाठी नितीन पाटील यांच्यासह कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांनी अर्ज दाखल केला होता. तर उपाध्यक्षपदासाठी पाच अर्ज दाखल झाले. भुमरे यांनी अर्ज माघार घेतल्यानंतर नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. उपाध्यक्षपदासाठी अर्जुन गाढे, दिनेश परदेशी, कृष्णा पाटील डोणगावकर, जगन्नाथ काळे, आणि आप्पासाहेब पाटील या पाच जणांनी अर्ज दाखल केले. पैकी परदेशी, पाटील यांनी माघार घेतल्याने तीन अर्ज शिल्लक राहीले.

जिल्हा बॅंकेची निवडणूक यावेळी चागंलीच गाजली. सर्वात आधी राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी व काॅंग्रेस या तीन पक्षांमध्ये बिघाडी होऊन काॅंग्रेसने स्वतंत्र पॅनल उभे केले. तर सत्ताधारी शिवसेना- राष्ट्रवादीने चक्क विरोधात असलेल्या भाजपला सोबत घेत शेतकरी विकास पॅनल बनवले. निवडणूक निकालात या पॅनलला २० पैकी १४ जागा मिळाल्या, तर काॅंग्रेसच्या पॅनलला ६ जागांवर समाधान मानावे लागले.

परंतु या निवडणुकीत सर्वात धक्कादायक निकाल लागला ते म्हणजे शेतकरी विकास पॅनलचे हरिभाऊ बागडे यांचा. त्याचा बिगरशेती मतदारसंघातून आश्चर्यकारक पराभव झाल्याने हा शेतकरी विकास पॅनलला मोठा धक्का मानला जात होता. मात्र ही शिवसेनेच्या नेत्यांचीच खेळी होती हे पुढे स्पष्ट झाले. नितीन पाटील हे भाजपचे असल्यामुळे त्यांना अध्यक्ष करण्यासाठी शिवसेनेते प्रवेश घेण्याची अट टाकण्य़ात आली होती.

नितीन पाटील यांनी देखील होकार दिला आणि शिवसेनेचे अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे यांनी त्यांचा मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश करवून घेतला. त्यामुळे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटीलच असणार हे जवळपास निश्चित होते. आज निवडणूकीच्या औपचारिकतेनंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले.

Edited by : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com