औरंगाबादला खंडपीठ अन् विमानतळ ही निलंगेकरांचीच देण..

राज्यात काम करत असतांनाच त्यांचे राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह अन्य नेत्यांशी चांगले संबंध होते.
औरंगाबादला खंडपीठ अन् विमानतळ ही निलंगेकरांचीच देण..
Let Shivajirao Patil Nilangekars memory News latur

निलंगा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आज प्रथम पुण्यस्मरण. या निमित्ताने आपल्या मंत्रीपदाच्या व एकूणच राजकीय कारकीर्दीत त्यांनी निलंगा, लातूर आणि मराठवाड्यासाठी केलेले भरीव विकासकामांची प्रकर्षाने आठवण होते. (Nilangekar's gift to Aurangabad bench and airport.) निलंगा शहरासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज लक्षात घेऊन त्यांनी आपल्या दुरदृष्ठीतून चाळीस वर्षापूर्वीच केली होती. त्यामुळे आज निलंगेकरांना मुबलक प्रमाणात पाणी मिळते, ही मोठी उपलब्धी होती.

राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असतांना निलंगेकराना विविध खात्याचे काम करता आले, त्यांचा अनुभव खूप मोठा होता. (Ex.chief Minister let. Shivajirao Patil Nilangekar, Maharashtra) पाटबंधारे खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे असतांना त्यांनी महाराष्ट्रात अनेक मोठ्या प्रकल्पांची उभारणी केली . कायम दुष्काळाच्या दुष्टचक्रात असलेल्या मराठवाडा व विदर्भातील मोठमोठे प्रकल्प त्यांच्या काळात पुर्णत्वास गेल्यामुळे येथील सिंचन क्षेत्रात वाढ झाली.

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे पाच महिन्याचे असताना त्यांच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरवले होते.  परंतु  त्यांच्या आईने मोठ्या जिद्दीने त्यांना वाढवले, शिक्षण दिले. आईच्या संस्काराची शिदोरी घेऊनच पुढे निलंगकेरांनी राजकारणात आपली छाप पाडली.  सामाजिक, राजकीय दृष्ट्या अत्यंत प्रतिकूल व तेवढ्याच संवेदनशील काळात एकीकडे ब्रिटिशांचे साम्राज्य तर दुसऱ्या बाजूला हैदराबादच्या निजामशाहीची दहशत असे वातावरण होते.

अशा काळात निलंगेकरांची जडणघडण झाली. ९ फेब्रुवारी १९३१ रोजी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा जन्म झाला होता. स्वातंत्र्य लढ्यातही त्यांच्या सहभाग राहिला. स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्यांना शासनाने गौरवले असले तरी त्यांनी कधीही मानधन स्वीकारले नाही. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी निलंगा येथे सुरुवातीला वकिली व्यवसाय सुरू केला, निलंगा येथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर निजामी राजवट असतानाही त्यांना १९५६- ४६ मध्ये पुढील शिक्षणासाठी ते कर्नाटककातील गुलबर्गा येथे गेले होते.

निलंगा ते गुलबर्गा घोड्यावर प्रवास..

तेथील नूतन विद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना त्यांच्याकडे असलेल्या संघटनकौशल्य, संयमीपणा, शांत वृत्ती, चिकित्सक दृष्टीकोण आदी गुणामुळे ते शिक्षकामध्ये प्रिय होते. एक जमिनदार शेतकरी म्हणून त्यांच्या वडीलाचा लौकिक होता. त्या काळात दळणवळणाच्या सुविधा नसल्यामुळे ते घोड्यावर बसून गुलबर्गावरून गावाकडे यायचे. त्यांनी पदवी पूर्ण करून एल.एल.बी.चे शिक्षण  पूर्ण करून वकिली व्यवसायाला सुरुवात केली.

१९४८ मध्ये मुंबई परिसरात मराठी भाषकांचा संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी लढा जोर धरत होता. १७ ऑक्टोबर १९४८ रोजी दादरला झालेल्या अधिवेशनात देखील त्यांचा सक्रिय सहभाग होता. काँग्रेस पक्षाचे विद्यार्थिदशेपासून निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आजही महाराष्ट्राला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे कै. श्रीपतराव सोळुंके यांच्याविरुद्ध १९५२ मध्ये निलंगेकरांनी पहिली निवडणूक लढविली, मात्र त्यांचा पराभव झाला. १९६२ नंतर त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करून निलंगा विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला. त्यानंतर सतत त्यांनी आपली पकड कायम ठेवली होती.

राज्यात काम करत असतांनाच त्यांचे राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह अन्य नेत्यांशी चांगले संबंध होते. काँग्रेसच्या शताब्दी महोत्सवात ते महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. याच महोत्सवात निलंगेकर यांनी  इंदिरा गांधी यांना महाराष्ट्रीयन 'इरकल' साडी भेट दिली होती. विशेष म्हणजे त्यांनी देखील ती आवडीने परिधान केली होती. गांधी घराण्याशी निकटचे संबंध असल्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात सुरुवातीला उपमुख्यमंत्री राहिलेले निलंगेकर राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री व थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री असताना मराठवाडा, विदर्भाच्या विकासासाठी त्यांनी विशेष कार्यक्रम राबवला होता.

औरंगाबादेत विमानतळाची उभारणी..

मराठवाड्यातील दुसरे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा लौकिक होता. औरंगाबाद येथील उच्च न्यायालय सुरुवातीला सुरू करीत असताना त्यांनी तात्पुरती ब्रँच मंजूर करून घेतली. औरंगाबाद येथे जवळपास चाळीस एकरामध्ये विमानतळाची उभारणी त्यांच्याच काळात झाली होती. मराठवाड्यासाठी खंडपीठ मंजूर करून घेतल्यानंतर आजही तेथे ४० ते ५० हजार वकील काम करत आहेत. शिवाय जिल्हा स्तरावरील जिल्हा न्यायालय, तालुकास्तरावरील न्यायालय, सिंचनाच्या सुविधा असे अनेक विकासकामे त्यांनी आपल्या कार्यकाळात पूर्ण केली.

शिवाय लातूर व जालना जिल्ह्याची निर्मितीही तत्कालीन मुख्यमंत्री  बॅ. ए.आर. अंतुले हे मुख्यमंत्री असताना निलंगेकरानी महत्वाची भूमिका बजावली होती. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी भीमा नदीवरील उजनी येथे मोठा प्रकल्प केला. पुणे जिल्ह्यातील टिंबे प्रकल्प, बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे मध्यम प्रकल्प, तेरणा नदीवरील लोअर तेरणा प्रकल्प, विदर्भातील नदीवर अप्पर वर्धा धरण, लातूर बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा नदीवर धनेगाव येथे धरण, तेरणा व मांजरा नदीवर अनेक ठिकाणी बॅरेजेस, अशा अनेक सिंचनाच्या योजना त्यांनी पाटबंधारे मंत्री असताना राबवल्या.

मराठवाड्यात अनेक सिंचन प्रकल्प..

लोअर तेरणा प्रकल्प करीत असताना सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यांना झगडावे लागले, न्यायालयांमध्ये प्रतिज्ञापत्र सादर करण्याची वेळ आली मात्र त्यांनी धरणाचे काम पूर्ण केलेच. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी महाराष्ट्रात अनेक मोठे प्रकल्प, मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प राबविल्यामुळे त्या भागातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. निलंगा विधानसभा मतदारसंघ अनेक लहान मोठे प्रकल्प त्यांनी उभे करून मतदार संघातील शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न केले. मसलगा मध्यम प्रकल्प, बडूर मध्यम प्रकल्प यासह विविध लघु प्रकल्प, मांजरा नदीवरील अनेक बॅरेजेस हे त्यांच्या दूरदृष्टी व नेतृत्वाची साक्ष म्हणावी लागेल. 

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in