नवविवाहितेच्या खूनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात; गृहमंत्र्यांचे ट्विट..

आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करत हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवला जाईल आणि गोरे कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळवून दिला जाईल, असे स्पष्ट केले आहे.
mantha murder case run fast track court news
mantha murder case run fast track court news

जालना : जिल्ह्यातील मंठा येथे एकतर्फी प्रेमातून नवविवाहित महिलेचा भर बाजारात चाकूने हल्ला करून खून करण्यात आला होता. या घटनेचे तीव्र पडसाद उमटून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला तातडीने कठोर शिक्षा करावी, अशी मागणी राज्यभरातून केली जात होती. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत हा खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार असल्याची माहिती ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. यामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळेल, असा विश्वास देखील गृहमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. 

मंठा येथे वैष्णवी गोरे या अवघ्या पाच दिवसांपुर्वी विवाह झालेल्या आणि माहेरी आलेल्या नवविवाहितेवर ३० जून रोजी ती बाजारात गेली असतांना आरोपीने तिच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला चढवला होता. एकतर्फी प्रेमातून या नराधमाने तिच्यावर पाच-सहा वार केल्यामुळे वैष्णवीचा मृत्यू झाला होता. या खूनानंतर मंठा आणि जालना जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मंठा येथे व्यापाऱ्यांनी एक दिवस बंद पुकारात हत्येचा तीव्र निषेध केला व आरोपीला तात्काळ शिक्षा देण्याची मागणी केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर मंठा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांनी या खूनचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी लावून धरली होती. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नुकतीच पीडित कुटुंबाची भेट घेऊन हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करत हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवला जाईल आणि गोरे कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळवून दिला जाईल, असे स्पष्ट केले आहे. 

वैष्णवी गोरे या १९ वर्षीय तरुणीचा २६ जून रोजी जालन्यातील तरुणासोबत विवाह झाला होता. मांडव परतणीसाठी ही तरुणी २८ जून रोजी माहेरी आली होती.  आई आणि मैत्रीणीसोबत वैष्णवी ३० जून रोजी खरेदीसाठी बाजारात गेली होती. काही वेळाने वैष्णवीची आई परत गेली आणि वैष्णवी मैत्रीणी सोबत एकटीच असल्याचे पाहून शेख अल्ताफ शेख बाबू या २६ वर्षाच्या आरोपीने एकतर्फी प्रेमातून वैष्णवीवर चाकूने जोरदार हल्ला केला. यात वैष्णवीचा मृत्यू झाला. दरम्यान, खून केल्यानंतर आरोपीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न देखील केला. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com