विलासराव देशमुखांनी महाराष्ट्राला प्रगतशिल बनवले : नाना पटोले

समाजकारण, राजकारण, सहकार अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. राजकारणापलिकडे त्यांचे सर्वांशी अत्यंत स्नेहाचे संबंध होते.
Congress Leader Nana Patole- Vilasrao Deshmukh News Mumbai
Congress Leader Nana Patole- Vilasrao Deshmukh News Mumbai

मुंबई ः काॅंग्रेसचे दिवंगत नेते राज्याचे माजी मुख्यंमत्री विलासराव देशमुख यांना त्यांच्या जयंती निमित्त गांधी भवन येथे अभिवादन करण्यात आले. (Nana Patole said, Vilasrao Deshmukh made Maharashtra progressive.) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विलासरावांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत त्यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राला प्रगतशील बनवले, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री, लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त गांधी भवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नाना पटोले यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार मोहन जोशी,  माणिकराव जगताप, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, इंटकचे जयप्रकाश छाजेड, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदीप पाटील, देवानंद पवार, राजेश जाधव आदी उपस्थित होते.   

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले, सरपंच ते राज्याचा मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री या प्रदीर्घ राजकीय प्रवासात विलासराव देशमुख साहेबांनी त्यांना मिळालेली प्रत्येक जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. ( Vilasrao Deshmukh successfully fulfilled every responsibility given to him. समाजकारण, राजकारण, सहकार अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. राजकारणापलिकडे त्यांचे सर्वांशी अत्यंत स्नेहाचे संबंध होते.

महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास हेच त्यांचे ध्येय होते. महाराष्ट्राला प्रगतीशील राज्य बनवण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. (Vilasrao Deshmukh's career has been an inspiration to all of us) विलासराव देशमुख साहेबांची कारकीर्द आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अशा या महान लोकनेत्याला जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com