म्युकरमायकोसिस संसर्गजन्य आहे की नाही? टास्क फोर्सशी चर्चेनंतर अंतिम निर्णय..

देशात येणाऱ्या तिसऱ्या लाटेबाबत अंदाज व्यक्त केलाय. मात्र हा अंदाज असून तिसरी लाट कधी येईल हे आज सांगता येत नाही.
Health Minister Rajesh Tope press Conference News jalna
Health Minister Rajesh Tope press Conference News jalna

जालना : म्युकरमायकोसिसला संसर्गजन्य आजार जाहीर करा,अशा सूचना केंद्राने राज्याला दिल्या आहेत. मात्र म्युकरमायकोसीस हा आजार एकापासून दुसऱ्याला होत नाही, असा रिपोर्ट राज्याच्या टास्क फोर्स प्रमुखांनी दिला आहे. (Is myocardial infarction contagious? Final decision after discussion with the task force, said health minsiter rajesh tope) त्यामुळे केंद्राची ही सूचना टास्क फोर्स समोर ठेऊन यावर निर्णय घेऊ, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात व मराठवाड्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. या नव्या आजाराने आतापर्यंत अनेकांचे बळी देखील घेतले आहेत. केंद्र सरकारने हा आजार संसर्गजन्य असल्याचे जाहीर करा, अशा सचूना राज्याला दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जालना येथे बोलतांना राजेश टोपे यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. या आजारवर मोफत उपचार होणार का? यासाठी कुठली रुग्णालये निश्चित करण्यात आली आहेत, याची सविस्तर माहिती टोपे यांनी दिली.

प्रसार माध्यमांशी बोलतांना टोपे म्हणाले, म्युकरमायकोसिसवर मोफत उपचार करण्यासाठी शासकीय आणि खाजगी दवाखाने निश्चित करण्यात आले आहेत. (Public and private clinics were set up to provide free treatment for mucomycosis) या आजारावर उपचार करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लागू असलेले दवाखाने निश्चित करण्यात आले आहेत. शासकीय महाविद्यालयातील सर्व दवाखान्याचाही यात समावेश असेल.

रुग्णांवर होणाऱ्या खर्चापेक्षा दीड लाखांच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम यासाठी देण्यात येणार असून औषधी देखील मोफत देण्यात येणार आहेत. या आजारावर प्रभावी ठरणारे  एनफोटेरीसिन बी नावाचे महागडे औषध उपलब्धतेनुसार मोफत देण्यात येईल. सध्या आपल्याकडे एनफोटेरिसीन बी हे  कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. (We currently have low levels of Enfotercin B.) पुढील काळात याची आवश्यक्ता लक्षात घेता राज्यासाठी अधिक प्रमाणात हे आौषध मिळावे, अशी मागणी केंद्राकडे करण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिली.

तिसरी लाट कधी येईल सांगता येत नाही..

एनफोटेरिसीन उपलब्ध नसल्याने तुर्तास आम्ही हतबल झालो आहेत. पण या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना अकरा प्रकारच्या आरोग्य सुविधा मोफत देणार असल्याचेही टोपे यांनी स्पष्ट केले. येणाऱ्या प्रत्येक आजाराला तोंड देण्यासाठी त्यासाठी आवश्यक औषधींचा पुरेसा साठा आपल्याकडे असावा, यासाठी सर्व प्रकारचे ग्लोबल टेंडर काढण्यात आले असून जागतिक कंपन्या यात सहभागी झाल्या आहेत. (The Centeral government should facilitate all matters) आता केंद्राने सर्व बाबी सुलभ केल्या पाहिजेत, अशी अपेक्षाही टोपे यांनी व्यक्त केली.

मुंबईत कोरोना रुग्णससंख्या कमी झाली असली तरी ५० वर्षांवरील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे, या प्रश्नावर या रुग्णांची काळजी घेणं गरजेचं असून लवकरात लवकर या रुग्णांचे लसीकरण करणं गरजेचं असल्याचे टोपे म्हणाले. भारत सरकारच्या विज्ञान विभागाच्या त्रिसदस्यीय समितीने देशात येणाऱ्या तिसऱ्या लाटेबाबत अंदाज व्यक्त केलाय. मात्र हा अंदाज असून तिसरी लाट कधी येईल हे आज सांगता येत नसून या समितीचा अंदाज खरा समजून राज्यात पूर्ण तयारी करून घेतली जात असल्याचं टोपे यांनी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com