सरकारमध्ये बसलेल्या मुस्लिम मंत्री, नेत्यांनी हुजरेगिरी बंद करावी...

बकरी ईद संदर्भात जेव्हा राज्य सरकारने निर्णय घेतले तेव्हा सर्वच पक्षातील मुस्लिम नेते, मंत्री काय करत होते? केवळ आपल्या नेत्यांना खूष करण्यासाठी हुजरेगिरी करण्याचे काम या लोकांनी केले. आता समाजाची माफी मागण्याचे नाटक ही मंडळी करत आहे. पण माफी मागून काही होणार नाही, ज्या समाजाने तुम्हाला निवडूण दिले, मंत्री केले, त्यांचे प्रश्न तुम्हाला सोडवता येत नसतील तर पदावर कशासाठी बसलात. सरकार जर तुमच ऐकत नसेल तर मंत्रीपदाचे आणि आमदारकीचे राजीनामे तोंडावर फेकून तुम्ही बाहेर पडायला पाहिजे होते.
imtiaz jalil news aurangabad
imtiaz jalil news aurangabad

औरंगाबाद ः राज्य सरकारने जेव्हा आॅनलाईन जनावरे मागवण्याचा निर्णय घेतला तेव्हा सरकारमध्ये बसलेले मुस्लिम मंत्री, नेते आमदार मुग गिळून बसले होते का? असा संतप्त सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. समाजाच्या मोठ्या सणासाठी काही न करता तुम्ही आपल्या नेत्यांच्या पुढे फक्त माना डोलवता, पण तुम्हाला पुन्हा लोकांमध्ये जायचे आहे हे लक्षात ठेवा आणि हुजरेगिरी बंद करा, अशा शब्दांत इम्तियाज जलील यांनी सुनावले.

बकरी ईद अवघ्या काही तासांवर आली आहे, पण अजूनही कुर्बाणीसाठी गुजरातमधून जनावरे घेऊन येणारे शेकडो ट्रक मुंबई पोलीसांनी सीमेवर अडवून ठेवले आहेत. आमचे मुंबईमधील पदाधिकारी पावणे दोनशे किलोमीटरवर जाऊन पोलीसांशी संपर्क साधून या गाड्या सोडण्याची मागणी करत आहेत, राज्य सरकार परवानगी द्यायला तयार नाही. पाच दिवसांपासून ट्रक उभ्या असल्याने अनेक जनावरे मरण पावली आहेत, त्यामुळे आता सरकारने काही निर्णय घेतला तरी किती जनावरे लोकांपर्यंत पोहचतील आणि ते ईदची कुर्बाणी देऊ शकती हे सांगता येत नाही, अशी नाराजी देखील इम्तियाज यांनी व्यक्त केली.

१ आॅगस्ट रोजी साजरी केली जाणारी ईद यावेळी घरातच आणि प्रतिकात्मक कुर्बाणी देऊन साजरी करा, किंवा आॅनलाईन जनावरे मागवून धार्मिक विधा पार पाडा असे आवाहन राज्य सरकारच्या वतीने मुस्लिम समाजाला करण्यात आले होते. पंरतु बकरी ईदला कुर्बाणीचे महत्व असते, ती प्रतिकात्मक देताच येणार नाही, त्यामुळे शहरातील मैदानावर जनावरांचा बाजार भरवून खेरदीची व्यवस्था आणि ईदगाह मैदानासह मशिदींमध्ये नमाज अदा करण्याची परवानगी द्या, अशी मागणी मुस्लिम समाजाने लावून धरली होती.

खासदार इम्तियाज जलील यांनी यासाठी पुढाकार घेत सरकारशी पत्रव्यवहार सुरू केला होता. ईद काही तासांवर आली असतांनाही सरकाकडून याबाबत काहीच ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे इम्तियाज जलील यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे. इम्तियाज जलील म्हणाले, राष्ट्रवादीच्या एका मंत्री असलेल्या नेत्याने काही दिवसांपुर्वी बकरी ईद नेहमीप्रमाणेच साजरी होईल असे सांगितले होते. प्रत्यक्षात आॅनलाईन जनावरांची आॅर्डर दिलेल्या लोकांनाही कुर्बाणीसाठी जनावरे मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

ताेंडावर राजीनामे का फेकले नाहीत..

बकरी ईद संदर्भात जेव्हा राज्य सरकारने निर्णय घेतले तेव्हा सर्वच पक्षातील मुस्लिम नेते, मंत्री काय करत होते? केवळ आपल्या नेत्यांना खूष करण्यासाठी हुजरेगिरी करण्याचे काम या लोकांनी केले. आता समाजाची माफी मागण्याचे नाटक ही मंडळी करत आहे. पण माफी मागून काही होणार नाही, ज्या समाजाने तुम्हाला निवडूण दिले, मंत्री केले, त्यांचे प्रश्न तुम्हाला सोडवता येत नसतील तर पदावर कशासाठी बसलात. सरकार जर तुमच ऐकत नसेल तर मंत्रीपदाचे आणि आमदारकीचे राजीनामे तोंडावर फेकून तुम्ही बाहेर पडायला पाहिजे होते. पण तुम्ही समाजापेक्षा पद आणि प्रतिष्ठेला अधिक महत्व दिले. पुन्हा तुम्हाला समाजामध्येच जायचे आहे, हे लक्षात ठेवा, असा गर्भित इशारा देखील इम्तियाज जलील यांनी दिला.

सरकारच्या आॅनलाईन जनावरे मागवण्याच्या आवाहनाला आम्ही प्रतिसाद दिला, अनेकांनी आॅनलाईन पैसे पाठवून जनावरे खरेदी केली. पण ईद उद्यावर आलेली असतांनाही त्यांना कुर्बाणीसाठी ते मिळू शकत नाही. जनावरांना घेऊन येणारे ट्रक सरकारने राज्याच्या सीमेवर अडवून ठेवले आहेत. धार्मिक बाबीमध्ये एवढी ढवळढवळ सरकार का करत आहे? या पुढे हिंदु धर्मियांचे अनेक सण येणार आहेत, त्यांना देखील तुम्ही हाच नियम लावणार आहात का?

सरकारमध्ये बसलेल्या आणि आम्ही मुस्लीमांचे कसे कैवारी आहोत हे दाखवणाऱ्या कॉंग्रेस- राष्ट्रवादीला हे दिसत नाही का? मुख्यमंत्र्यांना हे समजत नाही का? असा प्रश्नही इम्तियाज यांनी उपस्थित केला. बकरी ईदच्या संदर्भात सरकार जेव्हा नियमावली तयार करत होते, तेव्हा तोंडात लाडू गिळून बसलेल्या आणि आता आपापल्या एसी चेंबर्समध्ये शांत बसलेल्या सगळ्या मुस्लिम मंत्री, आमदार आणि नेत्यांना मी ईदच्या शुभेच्छा देतो, असे उद्विग्न उद्‍गार देखील इम्तियाज जलील यांनी शेवटी काढले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com