मस्केंनी काम करत रहावे, त्यांना अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळेल.. - Musk should keep working, he will have more success than expected. | Politics Marathi News - Sarkarnama

मस्केंनी काम करत रहावे, त्यांना अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळेल..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 जुलै 2021

सर्वच वक्त्यांनी भाषणात राजेंद्र मस्के आमदार व्हावेत, असा उल्लेख केला. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी वरिल मत व्यक्त केले.
 

बीड : भाजपात कार्यकर्त्यांची गुणवत्ता पाहीली जाते. कमी कालावधीत गुणवत्ता सिध्द करून राजेंद्र मस्के देशातील सर्वात मोठ्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष बनले आहेत. त्यांना राजकारणात उज्वल भविष्य आहे, त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त मनोकामना पुर्ण होतील, अशी, कौतुकाची थाप भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मस्के यांच्या पाठीवर मारली. (Maske should keep working, he will have more success than expected.)

भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या पुढाकाराने शुक्रवारी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम झाले. (Bjp leader Pankaja Munde) यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी मस्के यांचे नियोजन, राजकीय संघटन आदी बाबींचे कौतुक केले. (Beed Bjp District Chief) कोरोना योद्ध्यांचा सन्मानही यावेळी पंकजा मुंडेंच्या हस्ते झाला. श्रीक्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती शिवाजी महाराज, आमदार लक्ष्मण पवार, राजेंद्र जगताप, अक्षय मुंदडा, आर. टी. देशमुख, आदीनाथ नवले आदी यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमात सर्वच वक्त्यांनी राजेंद्र मस्के आमदार व्हावेत, असे मत वक्त केले. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी त्यांना राजकारणात उज्वल भविष्य आहे. त्यांच्या इच्छेपेक्षा अधिक मनोकामना पूर्ण होतील, असे म्हणून सर्वांचा हुरुप वाढवला. त्यांनी निष्ठेणे काम केले, पक्षासाठी योगदान दिले म्हणून ते कमी कालावधीत या पदावर पोचले. भाजप पक्ष प्रस्तापित नव्हे तर कार्याकर्त्यांच्या गुणवत्तेचे मोल जानणारा पक्ष आहे.

सर्वसामान्य जनता आणि पक्षासाठी योगदान देणारे कार्यकर्ते मोठे झाले पाहीजेत. कार्यकर्ते मोठे झाले तरच नेते मोठे होतात. राजेंद्र मस्के यांनी काम करत रहावे, त्यांना भाजपात अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळेल, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी त्यांना दिला.
आपण अपघाताने राजकारणात आलो. उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस अगोदर दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी निवडणुक लढायची आहे, असे मला सांगीतले. त्यांच्या दुर्दैवी अपघातानंतर त्यांच्यावर प्रेम करणार्‍या लाखो- करोडो लोकांची जिम्मेदारी येऊन पडली.

या परिस्थितीत यापुढे त्यांचे नाव अजरामर करण्यासाठी राजकारणात सक्रीय व्हायचे असा, निर्णय घेतला. राजकारणात जय पराजय होत असतो. पण, त्यांची वारसदार हे माझ्यासाठी सर्वात मोठे पद आहे. त्यांच्या नावाचा विसर पडु द्यायचा नाही, त्यांचे प्रत्येक अधुरे स्वप्न पुर्ण करायचे, हे एकमेव ध्येय असल्याचेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

हे ही वाचा ः जिल्हाधिकाऱ्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला भेटच दिली नाही..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख