मुंडेंचा सेवाधर्म : विवाहाला मदत स्विकारताना कुटुंबियांचे डोळे पाणावले - Munde's Sevadharma: The family's eyes watered while accepting help for marriage | Politics Marathi News - Sarkarnama

मुंडेंचा सेवाधर्म : विवाहाला मदत स्विकारताना कुटुंबियांचे डोळे पाणावले

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 मे 2021

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळीत ‘सेवाधर्म’ उपक्रम राबविण्यात येत आहे. यातून लोकांना विविध माध्यमांतून मदत केली जात आहे.

बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या ‘सेवाधर्म’ उपक्रमांतर्गत विवाहासाठी मदत स्विकारताना कुटूंबियांच्या डोळ्यांच्या कडा पानावल्या.(Munde's Sevadharma: The family's eyes watered while accepting help for marriage) गुरुवारी परळीतील रमेश लोखंडे व प्रकाश व्हावळे या दोन कुटुंबांतील मुलींच्या विवाहासाठी प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत मुंडेंच्या आई रुक्मीणबाई मुंडे यांच्या हस्ते देण्यात आली.

परळी पालिकेचे गटनेते वाल्मिक कराड, मुख्याधिकारी अरविंद मुंडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, नगरसेवक केशव बळवंत, सभापती गोविंदराव मुंडे, सरचिटणीस अनंत इंगळे, आदी उपस्थित होते. (Various initiatives are being implemented to help families in Corona get married.) सेवाधर्म उपक्रमाच्या माध्यमातून लसीकरणासाठी मोफत वाहनसेवा, कोविड केअर सेंटरची उभारणी, कोरोनाबाधीत कुटूंबातील लग्नासाठी मदत असे विविध उपक्रम राबविले जात आहेत.

‘आम्ही कोरोनाग्रस्त होतो तेव्हा आमचे काय होईल, आमच्या मुलीचं काय होईल, ही चिंता मनात घर करत होती, पण बरे होऊन आल्यावर लेकीच्या लग्नासाठी धनंजय मुंडेंनी दिलेली मदत दिली, आम्ही विसरणार नाही, असे सांगताना लोखंडे दाम्पत्यांचे डोळे पाणावले.

कोरोना झालेल्या लोकांना कोणी जवळ करत नाही पण इथे आमच्या लेकराच्या लग्नाला तुम्ही मदत केलीत. असे म्हणत प्रकाश व्हावळे यांचेही आश्रु अनावर झाले. दरम्यान, जीव धोक्यात घालून रुग्णांना संजीवनी देणाऱ्या सर्वच हॉस्पिटलमधील आरोग्यसेवकांना टिफिन बॉक्सही उपक्रमांतर्गत भेट देण्यात आले.(Health workers were also given a tiffin box as part of the initiative.) तसेच ईदसाठी मुस्लिम बांधवांना शिरखुरमा किटचेही वाटप करण्यात आले.

हे ही वाचा ः अनिल परब यांच्या अडचणी वाढणार, चौकशीसाठी येणार दिल्लीहून विशेष टीम..

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख