दुरावलेले पंकजा मुंडे - धस पुन्हा एकत्र

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज नामंजूर करण्याच्या मुद्द्यावर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी सोबत सुरेश धसही होते.
Bjp Leader pankaja munde - Mla Suresh Dhas news beed
Bjp Leader pankaja munde - Mla Suresh Dhas news beed

बीड : यंदाच्या साखर गाळप हंगाम सुरु होण्याच्या तोंडावरच ऊसतोड मजूरांना दरवाढ आणि मुकादमांच्या कमिशनमध्ये वाढीच्या मुद्द्यावर संप सुरु झाला. या मुद्द्यावर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि याच पक्षाचे आमदार सुरेश धस यांच्यात टोकाची मतभिन्नता दिसून आली. पण, जिल्हा बँकेच्या निमित्ताने आता दोघांचे पुन्हा एकमत झाल्याचे चित्र आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ संचालकांच्या निवडीसाठी निवडणुक होऊ घातली आहे. यातील सेवा सोसायटीच्या ११ मतदार संघातील सर्वच उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. उमेदवारांचा ठराव देणाऱ्या सोसायट्यांना लेखा परिक्षणात सलग तीन वर्षे अ किंवा ब दर्जा नसल्याने उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत.

राज्यातील इतर जिल्हा बँकांना एक न्याय आणि बीड जिल्हा बँकेला वेगळा न्याय का, असा सवाल करत जिल्हा बँक बरखास्तीची राज्यातील सत्ताधाऱ्यांची ही खेळी असल्याचा आरोप करत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यांच्या सोबत आमदार सुरेश धस, आमदार लक्ष्मण पवार, आमदार नमिता मुंदडा व अक्षय मुंदडा होते. पंकजा मुंडें व सुरेश धस एकत्र दिसल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.

कारण, यंदाचा साखर गाळप हंगाम सुरु होण्याच्या तोंडावरच ऊसतोड मजूरांच्या मजूरीदरात आणि मुकादमांच्या कमिशनमध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी विविध संघटनांनी संप पुकारला. भाजपकडून संपाची धुरा सुरेश धसांच्या खांद्यावर टाकण्यात आली. वास्तविक पुर्वीपासून ऊसतोड मजूर आणि मुंडे असे समिकरण असताना धसांची एंट्री त्यांना भावली नाही. धसांनी मात्र, मिळालेल्या संधीचे सोने करत महाराष्ट्र पिंजून काढला.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या सुचनेवरुन त्यांचे नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच बीड व अहमदनगर अशा १४ जिल्ह्यांत रितसर दौरेही झाले. त्यांनी प्रत्येक आंदोलनस्थळी दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे व पंकजा मुंडे यांचे छायाचित्र असलेले बॅनर लावले असले तरी या मुद्द्यावर दोघांमधील दरी लपून राहीली नाही.

जिल्ह्यात झालेल्या मेळाव्यांतूनही या दरीचे प्रदर्शन झाले. एवढेच नाही तर पंकजा मुंडे च्या व सुरेश धस यांच्या मागणीतही मोठी तफावत होती. होता. अखेर पुणे येथील साखर संघाच्या बैठकीच्या निमंत्रणावरुनही धसांनी रान पेटविले. या बैठकीत केलेली मागणी आणि मान्य झालेली मागणी कशी ऊसतोड मजूरांच्या तोंडाला पाने पुसणारी असल्याचे त्यांनी विश्लेषणासह स्पष्ट केले. तर, दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडे यांनी मात्र यावर समाधान व्यक्त केले.

केवळ मागणीतच मतभिन्नता नव्हती तर दोघांमध्ये दरी पडल्याचे हे लक्षण दोघांच्या बोलण्यावरुन स्पष्ट झाले होते. अगदी मागच्या पंधरवाड्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी मुंबईत घेतलेल्या बैठकीलाही धस हजर नव्हते. पण, राज्यपालांना भेटीवेळी दोघे एकत्र दिसल्याने या दोघांमधील संबंध पुर्वपदावर येत असल्याचे बोलले जाते.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com