मुंडे भगिनींना शह आहेच;पण सेनेलाही रोखण्याची डाॅक्टरांवर जबाबदारी..

भाजपमध्ये डाॅक्टर म्हणून परिचित असलेल्या कराड यांनी काल केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि लगोलग त्यांना अर्थ खात्याची जबाबदारीही सोपवण्यात आली.
Bjp Central Minister Dr. Karad- Shivsena-Pankaja Munde news Aurangabad
Bjp Central Minister Dr. Karad- Shivsena-Pankaja Munde news Aurangabad

औरंगाबाद ः भाजपचे नवनिर्वाचित केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांना बळ देत पक्षाने जिल्ह्यात शिवसेना व भाजपला रोखण्याचे धोरण आखले आहे. २५-३० वर्ष ज्या शिवसेनेसोबत युती केली तो मित्र आज भाजपचा शत्रू नंबर एक झाला आहे. तर केंद्रात भाजपचे बहुमताचे सरकार असतांना देखील औरंगाबाद सारख्या मराठवाड्याची राजधानी असलेल्या जिल्ह्याचा खासदार एमआयएमचा आहे. (The Munde sisters have the upper hand, but it is the responsibility of the doctors to stop the shivsena as well.) भविष्यात हे डोकेदुखीचे ठरू नये, यासाठी देखील भाजपने कराड यांना बळ दिल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे. या शिवाय मुंडे भगिनींना शह हा देखील कराड यांच्या मंत्रीपदाचा एक भाग असल्याचे बोलले जाते.

पेशाने डाॅक्टर असलेल्या भागवत कराड यांच्या माध्यमातून भविष्यात भाजप शिवसेना आणि एमआयएम या पक्षाला इंजेक्शन टोचण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये राज्यसभेवर निवड आणि वर्ष उलटत नाही तोच केंद्रात राज्यमंत्री तेही अर्थखात्याचे ही डाॅ. कराड यांची राजकारणातील खूप मोठी झेप समजली जाते. (Bjp Central State Fianance Minister) अपक्ष नगरसेवक ते केंद्रीय राज्यमंत्री व्हाया उपमहापौर, महापौर, खासदार असा कराड यांचा राजकीय प्रवास. (Aurangabad Shivsena) या प्रवासात त्यांच्याबाबतीत स्वप्नवत वाटाव्यात अशा घटना घडल्या.

भाजपमध्ये डाॅक्टर म्हणून परिचित असलेल्या कराड यांनी काल केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि लगोलग त्यांना अर्थ खात्याची जबाबदारीही सोपवण्यात आली. राज्यसभेची उमेदवारी आणि आता केंद्रात अर्थ खात्याचे मंत्रीपद हे जसे त्यांच्या समर्थकांना धक्का देणारे होते, तसे ते स्वतः कराड यांच्यासाठी देखील आश्चर्यजनक होते. (Bjp Leader Pankaja Munde) परंतु कराड यांना राज्यसभेवर घेतांना आणि आता मंत्री करतांना देखील त्यांचे पक्षकार्य, निष्ठा आणि उच्चशिक्षण या गोष्टींचा प्रामुख्याने विचार करण्यात आल्याचे सांगितले जाते.

औरंगाबाद सारख्या जिल्ह्यात जिथे शिवसेना गेली २०-२५ वर्ष घट्ट पाय रोवून आहे, त्या जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवायची असेल तर जिल्ह्याला केंद्रात प्रतिनिधित्व दिले पाहिजे, असा विचार करूनच डाॅ. कराड यांची निवड करण्यात आली आहे. (Beed Bjp Mp.Dr.pritam Munde) राज्यात ओबीसी आरक्षणाचा निर्माण झालेला वाद आणि जातीय समीकरणे व भौगोलिक समतोल साधण्याच्या निकषात देखील डाॅ. कराड हे फिट बसत असल्याने राज्य व केंद्रातील वरिष्ठ नेत्यांनी कराड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

महापालिका निवडणुकीत शिवसेनेला टक्कर..

महाराष्ट्रातील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर बदलले सत्ता समीकरण पाहता शिवसेनेला टक्कर देण्यासाठी राज्यातील प्रत्येक भागाला प्रतिनिधित्व देण्याचे धोरण देखील कराड यांच्या पथ्यावर पडले.  मराठवाड्यात पकंजा मुंडे यांच्याऐवजी नवा ओवीसी चेहरा म्हणून देखील डाॅ. कराड यांची निवड करण्यात आली. फडणवीस सरकारच्या काळापासूनच कराड यांना बळ देण्यास सुरूवात झाली होती. मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद हे त्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल ठरले. 

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मराठवाडा वैधानिक मंडळाचे अध्यक्षपद कराड यांना सोडावे लागले. पण त्यानंतर काही महिन्यातच त्यांना राज्यसभेची लाॅटरी लागली. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम केलेले असल्यामुळे कराड यांना मराठवाड्यातील प्रश्नांची असलेली जान, त्यासाठी निधी मिळवणे, सरकार दरबारी पाठपुरावा याचा चांगला अनुभव आणि शिक्षण या कराडांच्या जमेच्या बाजू ठरल्या. राज्यसभेवर निवड झाल्यानंतर काल झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात देखील कराड यांनी या जोरावरच बाजी मारली.

केंद्रातील महत्वाच्या अशा अर्थ खात्याचे राज्यमंत्रीपद त्यांना मिळाल्यामुळे मराठवाडा व औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील प्रश्न व विकासकामे मार्गी लागण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. याचा भाजपला मराठवाड्यात व औरंगाबादेत आपले संघटन अधिक मजबुत करण्यासाठी निश्चितच फायदा होणार आहे. आगामी काळात औरंगाबाद महापालिकेच्या निवडणूका आहेत. ही निवडणूक भाजप स्वबळावर लढणार आहे. ज्या शिवसेनेसोबत गेली २५ वर्ष सत्ता उपभोगली तोच पत्र आता भाजपचा कट्टर विरोधक म्हणून मैदानात असणार आहे.

शिवसेनेला रोखण्यासाठी देखील कराड यांच्या मंत्रीदाचा वापर भाजपकडून केला जाण्याची शक्यता आहे. या शिवाय जिल्ह्यात एमआयएमचा खासदार असल्याने या पक्षाने देखील डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यांना रोखण्याचे आवाहन देखील भाजपपुढे  असणार आहे. एकंदरित डाॅ. भागवत कराड यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळातील समावेशाला अनेक कंगोरे आहेत. अर्थ खात्यासारखे महत्वाचे राज्यमंत्रीपद मिळाल्यामुळे भाजपकडून येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर शहर, जिल्हा आणि मराठवाड्यासाठी निधी आणण्याचे प्रयत्न केले जातील यात शंकाच नाही.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com