नाव, फोटोचा आग्रह धरणाऱ्या खासदारांना गणेशोत्सावाचा विसर..

नाव छापून गणेशोत्सवाचे निमंत्रण इम्तियाज जलील यांना धाडले तर खासदारांना या कार्यक्रमाला यायला वेळच मिळाला नाही.
नाव, फोटोचा आग्रह धरणाऱ्या खासदारांना गणेशोत्सावाचा विसर..
Mp Imtiaz Jalil Forget Ganeshotsav News Aurangabad

औरंगाबाद ः जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील हे सुशिक्षित, विकासाभिमुख लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपुर्वी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत त्यांनी जिल्हा गणेशोत्सव समितीत आपल्याला स्थान दिले जात नाही, (MPs who insist on name and photo forget Ganeshotsav) माझे नाव आणि फोटो देखील बॅनरवर नसतो याबद्दल समितीच्या संस्थापक अध्यक्षांकडे नाराजी व्यक्त केली होती.

लोकमान्य टिळकांनी सर्व-जाती धर्मांना जोडण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, असे उपदेशाचे डोस देखील समितीच्या पदाधिकाऱ्यांना पाजले. (Aimim Mp Imtiaz Jalil, Auragabad) आता जेव्हा त्यांचे नाव छापून गणेशोत्सवाचे निमंत्रण इम्तियाज जलील यांना धाडले तर खासदारांना या कार्यक्रमाला यायला वेळच मिळाला नाही.

एवढेच नाही तर सोशल मिडियावर सदैव कार्यरत आणि सजग असणाऱ्या इम्तियाज यांनी त्यांना निवडून दिलेल्या जनतेला साध्या गणेशोत्सावाच्या शुभेच्छा देखील देऊ नये, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. 

औरंगाबाद जिल्हा गणेश महांघाच्या वतीने दरवर्षी पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो.  या  महासंघाचे अध्यक्षपद हे दरवर्षी नव्या नेता, पदाधिकारी यांच्याकडे दिले जाते. यात कुठलाच राजकीय भेद न करता सर्वपक्षीय नेते, पदाधिकाऱ्यांना अध्यक्षपदाचा मान दिला जातो.

इम्तियाज जलील हे २१०४ मध्ये आमदार तर २०१९ मध्ये खासदार झाले. या दरम्यान झालेल्या गणेश महासंघाच्या बैठका, उत्सव समितीची कार्यकारणी यात इम्तियाज जलील यांना लोकप्रतिनिधी म्हणून स्थान देण्यात आले नव्हते.

खासदार झाल्यावर जेव्हा त्यांना महासंघाच्या कार्यालयाच्या उदघाटनाला निमंत्रित करण्यात आले, तेव्हा इम्तियाज यांनी आपल्याला देखील अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळावी, माझे देखील महासंघाच्या समितीत नाव असावे, अशी मागणी जाहिररित्या केली होती.

खासदार जामा मशिदीत..

यंदाच्या शांतता समितीच्या बैठकीत देखील त्यांनी आपल्या का डावलण्यात येते हे कळत नाही, असे म्हणत पुन्हा नाराजी व्यक्त केली होती.  माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जेव्हा कोरोनाची तिसरी लाट येऊ नये, आलीच तर गणराया ती पाकिस्ताना येऊ दे, असे साकडे घातले होते.

त्याला इम्तियाज यांनी सडेतोड उत्तर दिले होते. वक्रतुंड महाकाय असलेल्या गणेशाचे वर्णण करतांना गणरायाचा महती जगभरात कशी पसरलेली आहे, तेव्हा कोरोना जगातून नाहीसा होऊ दे, अशी प्रार्थना केली होती.  

नाव, फोटो, अध्यक्षपदासाठी आग्रह धरणाऱ्या, आणि मी फक्त मुस्लीमांचा, दलितांचा खासदार नाही, तर जिल्ह्यातील सर्वधर्मीयांनी मला निवडून दिले आहे, असे छातीठोकपणे सांगणाऱ्या इम्तियाज जलील यांनी शहरात असूनही राज्यातील महत्वाच्या अशा गणेशोत्सवाच्या साध्या शुभेच्छा जनतेला देऊ नयेत, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. 

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in