भाजप खासदार पुत्रांकडून स्वपक्षातील पदाधिकाऱ्याची धुलाई...

भाजपचे खासदार डॉ. भागवत कराड यांच्या कोटला कॉलनी भागातून ते आपल्या मुलाला निवडणुकीत उतरवणार असल्याची चर्चा आहे. तर त्यांच्या पक्षाच्या युवा मोर्चाचा सदस्य असलेला कुणाल मराठे हा देखील या वार्डातून निवडणूक लढवण्‍यास इच्छूक आहे. तशी तयारी देखील त्याने सुरू केली.
karad sons beat news auragangabad
karad sons beat news auragangabad

औरंगाबाद : नुकतेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात महाराष्ट्र बचाव आंदोलन केले. हे आंदोलन होऊन दोन दिवस उलटत नाही तोच शहरातील भाजप युवा मोर्चाच्या कार्यकारी सदस्यावरच स्वपक्षाच्या खासदार पुत्रांकडून ‘बचाव' म्हणण्याची वेळ आली. खासदार डॉ. भागवत कराड यांचे पुत्र हर्षवर्धन आणि वरूण यांनी कुणाल मराठे या पदाधिकाऱ्याला घरात घुसून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

कराड राहत असलेल्या कोटला कॉलनीतून मराठो महापालिका निवडणुकीची तयारी करत होता. तर याच वार्डातून कराड आपल्या मुलाला उभे करण्याच्या तयारीत आहेत. यावरूनच ही मारहाण झाल्याची चर्चा आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायलर झाला असून मराठे यांच्या तक्रारीवरून  हर्षवर्धन कराड व त्यांच्या साथीदाराविरोधात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनामुळे महापालिकेच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडल्या असल्यातरी सर्वच पक्षातील इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. भाजपचे खासदार डॉ. भागवत कराड यांच्या कोटला कॉलनी भागातून ते आपल्या मुलाला निवडणुकीत उतरवणार असल्याची चर्चा आहे. तर त्यांच्या पक्षाच्या युवा मोर्चाचा सदस्य असलेला कुणाल मराठे हा देखील या वार्डातून निवडणूक लढवण्‍यास इच्छूक आहे. तशी तयारी देखील त्याने सुरू केली. या वादातूनच खासदार कराड यांचे पुत्र हर्षवर्धन, वरूण आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी कुणाल मराठे याला घरात घुसून मारहाण केली. या प्रकरणी मराठे याने क्रातीचौक पोलीस ठाण्यात या दोघांसह त्यांच्या साथीदारा विरोधात तक्रार दिली.

त्यानूसार शनिवारी रात्री १० वाजता घरी जेवण करत असताना खासदार भागवत कराड यांचा मुलगा हर्षवर्धन, वरूण कराड व पवन सोनवणे हे मराठे यांच्या घरी गेले.  तू वार्डात फिरायचे नाही, लोकांना मदत करायची नाही, कुठलेही काम करायचे नाही, असे धमकावत त्यांनी मराठे यांना शिवीगाळ करत काठीने मारहाण करण्यास सरुवात केली. कोटला कॉलनी वॉर्डातुन मला तिकीट मिळणार असल्याने मी वार्डात लोकांना मदत  करत असतो. यामुळेच या  तिघांनी मला मारहाण केली असल्याचे कुणाल यांनी तक्रारीत म्हटले आहे.

हर्षवर्धन कराड यांच्याकडून मला व माझ्या कुटुंबियांना धोका आहे असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीवरून क्रांती चौक पोलीस ठाण्यात रात्री उशिरा हर्षवर्धन,  वरूण कराड, पवन सोनवणे त्यांच्याविरोधात मारहाण व धमकी दिल्याची प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com