'देह जावो अथवा राहो' म्हणत खासदार जाधव करणार प्राणांतिक उपोषण

लढाई आता निकराच्या व हातघाईच्या टप्प्यावर आली आहे.असे सांगत खासदार संजय जाधव यांनी उपोषणाची घोषणा केली.
'देह जावो अथवा राहो' म्हणत खासदार जाधव करणार प्राणांतिक उपोषण
Shivsena Mp Sanjay jadhav News Parbhani

परभणी ः `देह जावो अथवा राहो, पांडूरंगी दृढ भावो`, या अभंगातून शिवसेना खासदार संजय जाधव यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी  निकराची लढाई सुरु झाल्याचे संकेत दिले आहेत. सात सप्टेंबरपासून प्राणांतिक उपोषण सुरु करण्याची घोषणा त्यांनी केली. (MP Jadhav will go on a deadly fast for Demand of Medical College) शुक्रवारी या आंदोलनात संत, महंत, वारकरी सांप्रदाय, लोककलावंत व खेळाडूंनी मोठ्या संख्येनेसहभागी होऊन आंदोलनाला पाठींबा दर्शवला.
 
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'आम्ही परभणीकर' या हॅशटॅग खाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास शासनाने मंजुरी द्यावी, या मागणीसाठी एक सप्टेंबरपासून सर्वपक्षीयआंदोलन सुरु झाले आहे. (Shivsena Mp Sanjay Jadhav Parbhani)  शुक्रवारी (ता.तीन) या आंदोलनात जिल्ह्यातील संत, महंत, विविध वारकरी संस्थांचे वारकरी, लोककलावंत, खेळाडू, क्रीडा संघटक उतरले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला साक्षी ठेवून होणाऱ्या आंदोलनात जेष्ठांपासून लहान मुले, संत, महंत, वारकरी, पोतराज, वासुदेव, हलगीवाले, गोंधळ कलावंत यांच्यासह शेकडो खेळाडू सहभागी झाले होते.(Parbhani Medical College) 

किर्तन, भजन, भारुड, गवळण या पारंपारिक कलांचे सादरीकरण, तर दुसरीकडे जिम्नॅस्टीक, ढाल-तलवारी,लाठ्या-काठ्या, स्केटींगची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करुन मुले आणि खेळाडूंनी लक्ष वेधले. सर्वांचा एकच नारा होता, परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालेच पाहिजे.

तत्पुवी हे लोककलावंत,खेळाडू वाजत गाजत, पारिपांरिक कला सादर करीत आंदोलन स्थळी आले. नंतर तेथील व्यासपीठावर देखील त्यांनी आपल्या कला सादर केल्या. खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, विजय वाकोडे यांच्यासह विविध पक्षांच्या नेतेमंडळीची देखील आंदोलनस्थळी उपस्थित होती. 

लढाई आता निकराच्या व हातघाईच्या टप्प्यावर आली आहे.असे सांगत खासदार संजय जाधव यांनी संत नामदेव महाराजांचा 'देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो ॥, चरण न सोडी सर्वथा । आण तुझी पंढरीनाथा ॥ हा अभंग म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या.

जोपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा होणार नाही, तो पर्यंत हा लढा आता सुरुच राहणार असून सात सप्टेंबरपासून प्राणांतिक उपोषण सुरु करणार असल्याचे जाहिर केले. 

Edited By : Jagdish Pansare
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in