आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली नांदेडात आंदोलन..

काळ्या रंगाची वेशभूषा परिधान करून दंडावर काळी फीत बांधून येणे, काळा मास्क वापरणे असा गणवेश घालूनच मराठा आंदोलकांनी सहभागी व्हावे.
Maratha Reservation newsNanded
Maratha Reservation newsNanded

नांदेडः मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शुक्रवारपासून (ता.२०) राज्यभर मूक आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला नांदेड येथून खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात सुरुवात होणार आहे. (Movement for reservation in Nanded under the leadership of Sambhaji Raje Chhatrapati) सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.

सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाही तर लाल महाल पुणे ते मुंबई विधान भवन लाँग मार्चही काढला जाणार आहे. ( Mp Sambhajiraje Chhatrapati) पहिल्या टप्प्यातील ज्या जिल्ह्यात आंदोलन होईल त्यानंतर तिथेच लाँग मार्चच्या तयारी संदर्भात प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे.

दरम्यान, १६ जूनपासून मराठा क्रांती मूक आंदोलनाचे दुसरे पर्व कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधिस्थळापासून सुरू झाले. त्याची आचारसंहिताही जाहीर करण्यात आली. काळ्या रंगाची वेशभूषा परिधान करून दंडावर काळी फीत बांधून येणे, काळा मास्क वापरणे असा गणवेश घालूनच मराठा आंदोलकांनी सहभागी व्हावे.

मराठा समाजाने यापूर्वी ५८ मूक मोर्चाने जगात आदर्श निर्माण केला होता; तोच आदर्श घेऊन यापुढेही वाटचाल करणे क्रमप्राप्त आहे, असे आवाहनही पत्रकात करण्यात आले.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com