आई, आम्हाला तुमचा नेहमीच अभिमान वाटतो..

शेती परवडत नाही, हे वाक्य नेहमीच आपल्या कानावर पडते. यात बदल व्हावा आणि शेती व्यवसाय परवडणारा ठरावा यासाठी आई आपण करीत असलेल्या या प्रयोगांचे नक्कीच अनुकरण होईल.
mla dhiraj deshmukh  news latur
mla dhiraj deshmukh news latur

लातूर ः राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशाली देशमुख या आपल्या शेतीतील नवनवीन प्रयोगासाठी नेहमीच ओळखल्या जातात. अगदी साखर कारखान्यातील नव्या वाणाच्या ऊसापासून विक्रमी साखरेचे उत्पादन असो की मग आता लाल, पिवळ्या रंगाच्या ढोबळी मिरचीचा प्रयोग.

वैशाली देशमुख या सतत शेतात निरनिराळे प्रयोग करून केवळ मराठवाड्यातीलच नाही तर राज्यातील शेतकऱ्यांना प्रेरित करत असतात. शेती परवडत नाही हे शब्दच त्यांनी खोटे ठरवले आहेत. त्यांच्या या कामाचे एक आई म्हणून त्यांचे तीन्ही मुले अमित, रितेश, धीरज यांना कौतुक वाटते. ते  याबद्दल भरभरून व्यक्त देखील होतात.

लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख पुन्हा एकदा आपल्या आईने शेतात केलेल्या वेगळ्या प्रयोगाने प्रभावित झाले आहे. आई, आम्हाला तुमचा नेहमीच अभिमान वाटतो, अशा शब्दांत त्यांनी आई वैशाली देशमुख यांच्याबद्दलच्या भावना सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

धीरज देशमुख यांनी आपल्या फेसबुकवरून एक पोस्ट व्हायरल केली आहे. त्यात ते म्हणतात, आदरणीय आई, आम्हाला नेहमीच तुमचा अभिमान वाटतो. तुम्हाला शेतीची, मातीची मनापासून ओढ आहे. तुम्ही शेतीत रमता, राबता, नाविन्यपूर्ण प्रयोग करता. ते प्रयोग यशस्वी करीत तरुणांसमोर उदाहरण म्हणून ठेवता. त्यातून त्यांच्या मनात प्रयोगशील शेतीची ज्योत पेटवता.

हे खरोखरीच अभिमानास्पद आहे आणि तितकेच प्रेरणादायीसुद्धा. हे सगळे मी आपल्या मुलाच्या रूपानेच नव्हे तर एक युवा शेतकरी या रूपानेही अनुभवत आहे. आपल्या दूरदृष्टीतून बाभळगाव येथील बॅक टू रुट्स फार्म येथे नेहमीच वेगवेगळे प्रयोग सूरु असतात.

गेल्या काही महिन्यांपूर्वी आपण बचेटा वाणाच्या पिवळ्या रंगाच्या आणि इन्स्पिरेशन वाणाच्या लाल रंगाच्या शिमला मिरचीची (ढोबळी मिरची) शेडनेटमध्ये लागवड केली. यामागचा आपला अभ्यासपूर्ण दृष्टिकोन आणि आपली तळमळ मी स्वतः पाहिली आहे. आपण जानेवारी महिन्यात एक एकरावर १० हजार रोपांची लागवड केली आणि आज पहिली तोडणीही झाली. यात १ टन शिमला मिरचीचे अतिशय दर्जेदार उत्पादन मिळाले.

लाल, पिवळ्या शिमला मिरची

हे उत्पादन ३५ ते ४० टनापर्यंत नेण्याचे आपले ध्येय आहे. याला बाजारात १०० ते १५० रुपये किलो भाव मिळू शकतो. वास्तविक, बहुतांश शेतकरी हिरव्या रंगाच्या शिमला मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. त्याला बाजारात २० ते ४० रुपये किलो भाव मिळतो. त्यामुळे लाल आणि पिवळ्या रंगाच्या शिमला मिरचीचे उत्पादन शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर ठरणारे आहे. हे आपण यातून दाखवून दिले आहे.

शिमला मिरचीबरोबरच आपण झुकीनी या पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या परदेशी काकडीच्या शेडनेटमधील लागवडीचाही प्रयोग अशाच प्रकारे यशस्वी केला आहे. शेती परवडत नाही, हे वाक्य नेहमीच आपल्या कानावर पडते. यात बदल व्हावा आणि शेती व्यवसाय परवडणारा ठरावा यासाठी आई आपण करीत असलेल्या या प्रयोगांचे नक्कीच अनुकरण होईल, युवा शेतकरी बांधवांना यातून प्रेरणा मिळेल, याची मला खात्री असल्याचेही धीरज देशमुख यांनी म्हटले आहे.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com