मोदी म्हणाले, दानवेजी महत्वाची जबाबदारी दिली आहे, संधीचं सोनं करा..

नव्या मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्र्यांच्या कुटुंबियासोबत मोदींची ही पहिलीच भेट होती.
मोदी म्हणाले, दानवेजी महत्वाची जबाबदारी दिली आहे, संधीचं सोनं करा..
Minister Raosaheb Danve and family meet pm Modi news Aurangabad

औरंगाबाद ः केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या कुटुंबियासह काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बारा मिनिटांच्या या भेटीत स्वतःदानवे, त्यांच्या पत्नी निर्लमा, मुलगा आमदार संतोष, मुलगी आशा, आणि नातू शिवम यांच्यांशी संवाद साधला. (Modi said, Danveji has given important responsibility, seize the opportunity.) दानवे यांच्यांशी हिंदीतून बोलतांना `आपको बडी जिम्मेदारी सौपी है, काम करने का बहोत मौका है, इस मौके का फायदा उठाकर लोगोंकी सेवा किजीए`, असे म्हणत त्यांनी रेल्वे राज्यमंत्री म्हणून शुभेच्छा दिल्या.

दानवेंशी बोलल्या नंतर पंतप्रधानांनी निर्मला दानवे यांना मराठीत तुम्ही काय करता असे विचारले. यावर मी गृहणी आहे, शिवाय समाजकार्यात देखील सक्रीय असल्याचे सांगितले. (PM Narednra Modi) रावसाहेब दानवे हे जेव्हा दिल्ली किंवा कामा निमित्त बाहेर असतात तेव्हा मतदारसंघातील अडअडचणी आणि नागरिकांच्या भेटी घेत असल्याचे सांगितले. त्यावर ही चांगली गोष्ट आहे, म्हणत त्यांनी निर्मला दानवे यांचे कौतुक केले.

त्यानंतर आमदार संतोष दानवे यांच्याशी पुन्हा हिंदीतून सवांद साधत त्यांच्या शिक्षणा संदर्भात विचारले, शिवाय मतदारसंघातील परिस्थिती कशी आहे? कोरोना काळात कुठल्या अडचणी आल्या, शेतकरी, पीकं-पाणी याबद्दलही विचारले. (Central Railway State Minister Raosaheb Danve) दानवे यांच्या कन्या आशा पांडे यांना मराठीतून तुम्ही काय करता असे विचारले. तेव्हा आपण गृहिणी असून समाजकारणात देखील आहोत. सरपंच आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत असल्याचे त्यांनी पंतप्रधानांना सांगितले. आमदार संतोष दानवे यांना मतदारसंघातील कामात देखील आपण मदत करत असल्याचे त्या म्हणाल्या.

रावसाहेब दानवे यांचे नातू शिवम पांडे यांचीही मोदींनी चौकशी केली, त्यांचे शिक्षण, आवड या विषयी विचारणा करत दानवे कुटुंबियाची आस्तेवाईक चौकशी केली. पंतप्रधान मोदी यांना भेटून खूप आनंद झाल्याची प्रतिक्रिया दानवे कुटुंबियांनी व्यक्त केली. दिल्लीत सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. रावसाहेब दानवे यांच्यावर नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये रेल्वे,कोळसा,खाण मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नव्या मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्र्यांच्या कुटुंबियासोबत मोदींची ही पहिलीच भेट होती. काल (ता.२२) रोजी दुपारी ठीक ११ वाजता ही भेट झाली. तत्पुर्वी २१ रोजी रावसाहेब दानवे यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे कुटुंबियासह भेटीची वेळ मागितली होती. दुसऱ्या दिवशी अकराची वेळ मिळाल्यानंतर कालही भेट झाली.  रावसाहेब दानवे, संतोष दानवे व शिवम पांडे हे दिल्लीतच होते. तर निर्मला दानवे, आशा पांडे या भेट नक्की झाल्यानंतर औरंगाबादहून दिल्ली गेल्या. कोरोनाचे सगळे नियम पाळत ही भेट झाली. बारा मिनिटांच्या भेटीत मोदींनी दानवे कुटुंबातील सर्वच सदस्यांशी संवाद साधला.

Edited By : Jagdish Pansare


 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in