कराड, दानवेंना मोदींनी बक्षीस दिले, त्यांनी आता मराठवाड्याला गिफ्ट द्यावे..

रावसाहेब दानवे हेच रेल्वे राज्यमंत्री झाल्यामुळे रेल्वेतील दक्षिणेतील अधिकाऱ्यांच्या उदासीन आणि सापत्न वागणूकीच्या धोरणामुळे रखडलेले प्रश्न मार्गी लागतील.
Mim Mp Imtiaz Jalil reaction News Aurangabad
Mim Mp Imtiaz Jalil reaction News Aurangabad

औरंगाबाद ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात खासदार डाॅ.भागवत कराड यांचा समावेश करण्यात आला आहे. अर्थखात्याचे राज्यमंत्रीपद त्यांना देण्यात आले आहे, तर जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांना रेल्वे सारखे महत्वाचे खाते देण्यात आले आहे. मोदी सरकारने या दोन नेत्यांना दिलेले हे बक्षीस आहे. (Modi gave a gift to Karad, Danve, they should give a gift to Marathwada now) आता या भागातील नागरिकांचे प्रश्न विकासाचे प्रकल्प तातडीने मार्गी लावून मराठवाड्यालाही चांगले गिफ्ट द्यावे, अशी अपेक्षा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली आहे.

रावसाहेब दानवे यांना रेल्वे मंत्रालयाचे राज्यमंत्रीपद मिळाल्यामुळे त्यांच्याकडून खूप पेक्षा आहेत, असेही ते म्हणाले. डाॅ.भागवत कराड, रावसाहेब दानवे यांच्या मंत्रीमंडळातील समावेश आणि त्यांना मिळालेली महत्वाची जबाबदारी याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. (AIMIM Mp Imtiaz Jalil Aurangabad) अनेकांनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करतांनाच काही अपेक्षाही व्यक्त केल्या आहेत. जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील या निमित्ताने दोन्ही मंत्र्यांकडून मराठवाड्याचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

इम्तियाज जलील म्हणाले, दोन्ही नेत्यांना महत्वाची जबाबदारी देत पंतप्रधान मोदींनी एकप्रकारे बक्षीसच दिले आहे. जालन्याचे खासदार व माझे सहकारी रावसाहेब दानवे यांना तर रेल्वे मंत्रालयाची संधी मिळाली आहे, ही त्यांच्यासाठी आणि मराठवाड्यासाठी खूप मोठी आणि अपेक्षा वाढवणारी गोष्ट आहे. मराठवाड्याच्या जालना जिल्ह्याचे प्रतिनिधित्व दानवे गेल्या २२ वर्षांपासून करत आहेत.  विशेषतः मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांची त्यांना जाण आहे.

आधी रेल्वे प्रश्न घेऊन आम्हाला रेल्वेमंत्र्यांचे उंबरठे झिजवावे लागायचे. याआधीचे केंद्रीय रेल्वे मंत्री पीयुष गोयल हे महाराष्ट्राचे असल्यामुळे त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. मी स्वतः लोकसभेत आणि प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना मराठवाड्यातील रेल्वे प्रश्न प्राधान्यांने सोडवण्याचे प्रयत्न केले. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. आता रावसाहेब दानवे हेच रेल्वे राज्यमंत्री झाल्यामुळे रेल्वेतील दक्षिणेतील अधिकाऱ्यांच्या उदासीन आणि सापत्न वागणूकीच्या धोरणामुळे रखडलेले प्रश्न मार्गी लागतील, अशी  अपेक्षा आहे.

कराड निधीचे पाठबळ देतील..

परभणी-मनमाड रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण, दुहेरीकरण, पीटलाईन, औरंगाबाद-पुणे रेल्वे मार्ग,  औरंगाबाद-चाळीसगांव रेल्वे मार्ग हे वर्षानुवर्ष रखडलेले प्रश्न दानवे यांना चांगलेच माहित आहेत. आता कुणाकडे जाण्याची गरज राहिलेली नाही. नफ्या-तोट्याचे गणित किंवा फुटपट्टी न लावता मराठवाड्याची गरज म्हणून हे प्रश्न दानवे यांनी तातडीने मार्गी लावावेत, ही जिल्ह्याचा खासदार म्हणून माझी अपेक्षा आहे.

डाॅ. कराड यांना देखील केंद्रांत मोठे आणि महत्वाचे खाते मिळाले आहे. त्यामुळे मराठवाडा आणि जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य सरकारकडून केल्या गेलेल्या घोषणांना कराड यांच्याकडून निधीचे पाठबळ मिळाले तर तेही मार्गी लागतील. मराठवाड्यातील या दोन नेत्यांना मिळालेली ही सुवर्ण संधी त्यांनी दवडवू नये, असेही इम्तियाज जलील म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com