मनसेचा घंटानाद, शिवसेना म्हणते हा तर भाजप पुरस्कृत कार्यक्रम..

मात्र मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी मनसेने आज सुपारी हनुमान मंदीरासमोर घटांनाद आंदोलन केले.
मनसेचा घंटानाद, शिवसेना म्हणते हा तर भाजप पुरस्कृत कार्यक्रम..
Mns Ghnta Naad protest-Shivsena Aurangabad News

औरंगाबाद ः मंदिरे खुली करा या मागणीसाठी मनसेने आज शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या गुलमंडीच्या सुपारी हनुमान मंदीरासमोर घंटानाद आंदोलन केले. काही दिवसांपुर्वी भाजपने देखील शहरात मंदिरांसाठी घंटानांद करत राज्यातील आघाडी सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. (MNS's bell ringing, Shiv Sena is a BJP sponsored program.) भाजपच्या आंदोलनापाठोपाठ मनसेनेही आज आंदोलन केल्यानंतर शिवसेनेने यावर बोचरी टीका केली आहे.

मनसेचे आंदोलन म्हणजे भाजप पुरस्कृत कार्यक्रम असून त्यांच्यात मंदिर खुले करण्याची ताकद नसल्याची टीका शिवसेनेने केली आहे. (Shivsena Leader Chandrakant Khaire Aurangabad) राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजूनही धार्मिकस्थळे खुली करण्यात आलेली नाहीत. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका, केरळमध्ये वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या पाहता महाराष्ट्रात कुठल्याच प्रकारचे गर्दी जमवणारे राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, समाजिक कार्यक्रम नको, असे आवाहन खुद्द उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

मात्र मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी मनसेने आज सुपारी हनुमान मंदीरासमोर घटांनाद आंदोलन केले. (Mla Ambadas Danve Aurangabad) आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होतो. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपुर्वी शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी कावड यात्रा काढली होती.

मोजक्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पंरपरा खंडीत होऊ नये म्हणून काढण्यात आलेल्या व खडकेश्वर महादेव मंदिरात बंदी असतांना मागच्या दाराने प्रवेश केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल केले.

आता मनसेच्या घंटानाद आंदोलनाला भाजप पुरस्कृत कार्यक्रम असे हिणवत शिवसेनेने टीका केली आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे यांनी मनसेवर हा कार्यक्रम भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप केला आहे. शिवाय मनसे मंदिरे खुली करू शकत नाही, त्यांच्यात तेवढी धमक नाही. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलेले आहे.

त्याचे पालन सर्वांनी करणे आवश्यक आहे, त्यामुळे मनसेने केवळ स्टटंबाजीसाठी आंदोलन करून शिवसेनेच्या नादाला लागू नये, असा इशारा देखील या नेत्यांनी दिला आहे. आता मनसेकडून यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in