मनसेचा गनिमीकावा; भल्या पहाटे महापालिका आयुक्तांच्या बंगल्याचे नळ कनेक्शन कट..

मनसेने देखील ७ जुलै रोजी महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांना निवदेन देऊन आठवडाभरात या आदेशाची अंमलबाजावणी करणण्याची मागणी केली होती.
Mns Tap Connection cut News Aurangabad
Mns Tap Connection cut News Aurangabad

औरंगाबाद ः गेल्या आठवड्या मनसेच्या वतीने महापालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांना शहरातील पाणी पुरवठ्या संदर्भात निवदेन देण्यात आले होते. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शहराला दोन दिवसआड पाणी पुरठ्याचे नियोजन करण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. (MNS tap connection cut of Municipal Commissioner's bungalow.) त्यानंतर मनसेने देखील या विषयी आक्रमक भूमिका घेत आठवडाभरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला नाही, तर आयुक्तांच्या बंगल्याचे नळ कनेक्शन कट करू असा, इशारा दिला होता.

पंरतु मनसेच्या या निवेदनाची महापालिका आयुक्तांनी दखल घेतली नाही. शेवटी मनसेने आज गनिमीकावा करत भल्या पहाटे आयुक्तांच्या बंगल्याचे नळ कनेक्शन कट करत दणका दिला. (Municipal Commissinor Astikkumar pandey Aurangabad) मनसेच्या या अनोख्या आंदोलनाची जोरदार चर्चा आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे आता नागरी प्रश्नावरून अधिक आक्रमक झाल्याचे या निमित्ताने पहायला मिळाले.

मनसेचे आंदोलन हे नेहमीच वेगळे आणि प्रशासनाला घाम फोडणारे असतात. औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करणारे जायकवाडी धरण भरलेले असतांनाही नागरिकांना आठ-दहा दिवसानंतर पाणी मिळते. यावर अनेक पक्षांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली. शिवसेना-भाजप हे सत्ताधारी असल्याने त्यांना यावर ठोस भूमिका घेता आली नाही, तर काॅंग्ेस-राष्ट्रवादीने या विषयावर कधी भूमिकाच घेतली नाही.

परंतु मनसेने शहरातील रस्ते, ड्रेनेज, पाणी यासह अन्य विषयांवर भूमिका घेत आंदोलने केली होती. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी काही दिवसांपुर्वी शहरातील पाणी पुरवठ्याबद्दल महापालिकेला काही सूचना दिल्या होत्या. त्यात प्रामुख्याने शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे सांगितले होते.

त्यानंतर मनसेने देखील ७ जुलै रोजी महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांना निवदेन देऊन आठवडाभरात या आदेशाची अंमलबाजावणी करणण्याची मागणी केली होती. अन्यथा आयुक्तांच्या बंगल्याचेच नळ कनेक्शन कट करू, असा इशारा देखील या निवेदनात दिला होता.

त्यानूसार आज पहाटेच  मनसेचे जिल्हा संघटक बिपीन नाईक, वैभव मिटकर, शहर उपाध्यक्ष राहुल पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थीसेनेचे संकेत शेटे, प्रशांत दहिवाडकर, मनिष जोगदंड यांच्यासह काही मनसैनिकांनी दिल्लीगेट येथील महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात जाणारे नळ कनेक्शन कट केले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com