mla meghna bordikar help camel news
mla meghna bordikar help camel news

आमदार मदतीला धावल्या,अन जखमी उंट पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहिला..

उंटावर मुडा येथे पशुधन विकास अधिकारी डॉ. अजय धमगुंडे यांनी त्यांचे बंधू अस्थीरोग तज्ञ डॉ. रुपेश धमगुंडे व डॉ. शाहेद देशमुख यांनी उपचार सुरू केले. शस्ञक्रियेची गरज असल्याचे डॉक्टारांचे एकमत झाल्यावर त्याचीही तयारी केली. याची माहिती व खर्चही मेघना बोर्डीकर यांना सांगितला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता, तुम्ही आॅपरेशन करून उंटाला बरं करा, खर्चाची जबाबदारी माझी म्हणत पुढाकार घेतला.

परभणीः आडगाव (ता.जिंतूर) येथे पाय मोडलेल्या जखमी उंटाचे प्राण वाचविण्यासाठी जिंतूरच्या भाजप आमदार मेघना साकोरे - बोर्डीकर यांनी पुढाकार घेतला. स्वखर्चातून या उंटाच्या पायावर दोन शस्त्रक्रिया करून त्याला जीवदान देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या या उंटाच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने मेघना बोर्डीकरांसह उंटावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी समाधान व्यक्त केले आहे.

आडगाव येथे २ मे रोजी एक वयस्कर उंट पाय मोडलेल्या आवस्थेत आढळून आला होता. हा उंट राज्यस्थान मधून फिरस्तीवर आलेल्या लोकांनी इथेच सोडून दिल्याची माहिती आहे. या जखमी उंटावर सुरुवातीला पशुवैद्यकीय महाविद्यालया मार्फत उपचार करण्यात आले. परंतू मोडलेला पाय दुरुस्त करण्यात म्हणावे तसे यश आले नाही. त्यामुळे उंटाची प्रकृती खालावली आणि त्याला जागेवरून उठणेही अशक्य झाले. त्याच अवस्‍थेत ६ जून रोजी उंटाला इटोली येथील गोशाळेत हलविण्यात आले होते.

भाजप आमदार मेघना साकोरे - बोर्डीकर यांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी ९ जून रोजी स्वतःच्या मुडा (ता.जिंतूर) येथील फार्म हाऊसवर या उंटाची व्यवस्था केली. जखमी उंटावर मुडा येथे पशुधन विकास अधिकारी डॉ. अजय धमगुंडे यांनी त्यांचे बंधू अस्थीरोग तज्ञ डॉ. रुपेश धमगुंडे व डॉ. शाहेद देशमुख यांनी उपचार सुरू केले.

शस्ञक्रियेची गरज असल्याचे डॉक्टारांचे एकमत झाल्यावर त्याचीही तयारी केली. याची माहिती व खर्चही मेघना बोर्डीकर यांना सांगितला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता, तुम्ही आॅपरेशन करून उंटाला बरं करा, खर्चाची जबाबदारी माझी म्हणत पुढाकार घेतला.

१३ जून रोजी मुडा येथे हलवून उंटाच्या पायाचा एक्स-रे काढण्यात आला.  या उंटावर शस्ञक्रिया करणे अत्यावश्यक असल्याचे निश्चित झाल्यानंतर डॉ. विश्वास साळुंके (उदगीर) व डॉ. मामडे (परभणी) तसेच राजस्थान व यूएई येथील तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेण्यात आले.

२८ जून रोजी सदरील उंटावर पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली. दहा दिवसांपासुन बसुन असलेला उंट आता स्वतःहून तीन पायांवरती उभा राहिल्याने उंटाचा उपचारास सकारात्मक प्रतिसाद असल्याचे आढळून आले. त्यानंतर पुन्हा ४ जुलै रोजी उंटाच्या पायवर दुसरी छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली.

दरम्यान, परभणी येथील पशु वैद्यकीय महाविद्यालयात पशु चिकित्सा संदर्भातील साधन सामुग्री उपलब्ध नसल्याचे या उंटाच्या उपचारावरून समोर आले. महागामोलाची एक्सरे मशीन देखील तंत्रज्ञाअभावी बंद आहे. या संदर्भात आपण तातडीने  संबंधि मंत्र्याशी बोलणार आहोत.

या जखमी उंटाच्या उपचारासाठी गरज लागल्यानंतर या गोष्टीचा उलगडा झाला आहे. या मशिन व साधन सामुग्री अभावी आजपर्यंत कितीतरी मुक्या प्राण्याना जीव गमवावा लागला असावा, अशी भिती देखील मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केली आहे. ही मशिन तातडीने सुरु कऱण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com