या आमदाराने केली ट्रॅक्टरवर बसून सोयाबीनची पेरणी..

धीरज देशमुख यांना शेतीची आवड आणि जाण आहे. त्यामुळे लातूरला असले की नियमित शेतात जाऊन पीकपाणी याकडे त्यांचे बारकाईन लक्ष असते. नुकतीच त्यांनी बाभळगावला जाऊन शेतात दीड एकर क्षेत्राला पहिल्यांदा पाळी घातली. त्यानंतर त्या क्षेत्रावर ट्रॅक्टर चालवत पेरणी यंत्राच्या सहाय्याने सोयबीनची पेरणीही केली.
mla dheeraj deshmukh planed soyabin news
mla dheeraj deshmukh planed soyabin news

लातूर : मुंबईत वाढलेले, उच्च शिक्षण घेतलेले आणि आज राजकारणात आपल्या वडलांच्या पावला वर पाऊल ठेवून वाटचाल करत असलेले विलासरावांचे धाकटे चिंरजीव आमदार धीरज देशमुख यांना शेतात पाहून कुणालाही आश्चर्य वाटणार नाही. सध्या पावसाचे सर्वत्र आगमन झालेले आहे, खरीप हंगामाच्या पेरण्यांची लगबग सुरू आहे. अशावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी देखील आपल्या बाभळगांवच्या शेतात जाऊन ट्रॅक्टरने सोयाबीन पेरणी करत आपण खरे शेतकरी असल्याचे दाखवून दिले.

राजकारणात आलेले अनेकजण स्वतःला भुमीपूत्र, शेतकरी म्हणवून घेतात, पण प्रत्यक्षात यापैकी खरचं किती जण शेती करतात, किंवा त्यांना शेतीतलं कळंत हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. पण राजकारणात काही घराणी अशी आहेत, की जी राज्य, देश पातळीवर विविध पदांवर पोहचली, झळकली. पण त्यांनी आपले काळ्या आईशी म्हणजेच शेतीशी असलेले नाते कधी तोडले नाही. दिवंगत विलासराव देशमुख व त्यांचे देशमुख घराणे त्यापैकीच एक.

धीरज देशमुख यांना शेतीची आवड आणि जाण आहे. त्यामुळे लातूरला असले की नियमित शेतात जाऊन पीकपाणी याकडे त्यांचे बारकाईन लक्ष असते. नुकतीच त्यांनी बाभळगावला जाऊन शेतात दीड एकर क्षेत्राला पहिल्यांदा पाळी घातली. त्यानंतर त्या क्षेत्रावर ट्रॅक्टर चालवत पेरणी यंत्राच्या सहाय्याने सोयबीनची पेरणीही केली.

विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या आई वैशालीताई देशमुख या देखील उपस्थित होत्या. आई सोबत धीरज हे शेतात नेहमीच विविध प्रयोग करत असतात. या कुटूंबाची शेतीशी असलेली नाळ अजूनही घट्ट आहे, ती त्यांनी तुटू दिली नाही. विलासराव देशमुख यांचे शेतीबद्दलचे प्रेम सर्वश्रुत आहेच. आता तीच पंरपरा त्यांची मुलं पुढे चालवत आहेत.

कोरोनाचे संकट असले तरी त्यामध्ये दिलासा देणारी गोष्ट म्हणजे पावसाची समाधानकारक झालेली सुरूवात. त्यामुळे शेतकरी खुप मोठ्या आशेने खरीप हंगामाच्या पेरणीला लागला आहे. सध्या विविध उद्योग, व्यवसायात अडचणी जाणवत आहेत. अशा परिस्थितीत सगळीकडे शेती कामाला गती आली आहे. शेती हा आपल्या देशाचा पाया असून शेतीमुळेच आपला देश अन्न-धान्याच्या बाबतीत स्वंयपुर्ण बनला आहे.

त्यामुळे जमेल त्या पध्दतीने युवकांनी शेतीकडे देखील लक्ष देऊन घरच्यांना मदत करायला हवी व शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक ठेवायला हवा, असा विचार धीरज देशमुख नेहमीच व्यक्त करत असतात. या विचाराला स्वत: सोयाबीनची पेरणी करुन ते आचारणात आणतात हे देखील या निमित्ताने दिसले. यावेळी आपला मुलगा कशी पेरणी करतो हे पहाण्यासाठी त्यांच्या मातोश्री वैशालीताई देशमुख आवर्जून उपस्थित होत्या. पत्नी दिपशिखा देशमुख या देखील मुलासोबत पेरणीचे दृश्य पाहत होत्या.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com