पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्या प्रकरणी आमदार प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा..

जैस्वाल यांनी पोलिस ठाण्यातील खुर्च्या फेकून दिल्या, काचेच्या टेबलवर जोरात हात आपटत, पेनच्या स्टॅडने काच फोडली होती.
Shivsena Mla Pradip jaiswal News Aurangabad
Shivsena Mla Pradip jaiswal News Aurangabad

औरंगाबाद ः तुम्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मुद्दाम त्रास, देता त्यांना विनाकारण अटक करता असे म्हणत तत्कालीन शिवसेना माजी खासदार तथा विद्यमान आमदार प्रदीप जैस्वाल यांनी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गोंधळ घातला होता. (MLA Pradip Jaiswal sentenced to six months for rioting at police station.) आताच्या आता अटक केलेल्या दोन कार्यकर्त्यांना सोडा, अशी मागणी करत जैस्वाल यांनी पोलिस स्टेशनमधील कर्मचारी, अधिकारी यांना धमकावत शिवीगाळ करत टेबलवरी काच फोडली होती.

या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.एम.भोसले यांनी जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा व प्रत्येकी अडीच हजार प्रमाणे पाच हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. (Jaiswal was sentenced to six months imprisonment and a fine of Rs 5,000 each) दंड न भरल्यास शिक्षेत एक महिन्याची वाढ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मे २०१८ मध्ये शहरात उसळलेल्या दंगल प्रकरणात क्रांतीचौक पोलिसांनी गांधीनगर भागातील दोन आरोपींना अटक केली होती. या आरोपींना पोलिसांनी विनाकारण अटक केली असून त्यांना तात्काळ सोडा, अशी मागणी करत जैस्वाल आपल्या सात ते आठ समर्थकांसह क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गेले होते.  (Krantichowk police had arrested two accused from Gandhinagar area in the riot case.) या प्रकरणी त्यांच्यावर क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यातील पोलीस काॅन्सटेबल चंद्रकांत निवृत्ती पोटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून जैस्वाल यांच्या विरोधात भादवि कलम ३५३, ३३२,५०४,५०६,४२७ नूसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोटे यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार ते व त्यांचे इतर सहकारी २० मे २०१८ रोजी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावत असतांना रात्री अकराच्या सुमारास माजी खासदार प्रदीप जैस्वाल हे तिथे आले. त्यांनी मला गांधीनगरमधील अटक केलेल्या दोन आरोपींना जामीनावर सोडण्याची मागणी केली.

तेव्हा तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक अकमल यांना याची माहिती देऊन त्यांना बोलावून घेतो असे जैस्वाल यांना सांगितले व अकमल यांना बोलावून घेतले. त्यांनी देखील प्रदीप जैस्वाल यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत गांधीनगर मधील प्रकारामुळेच शहरातील दंगलीला सुरूवात झाल्याचे सांगितले. तसेच अटक केलेल्या आरोपींची चौकशी करून तपास करायचा असल्याचे जैस्वाल यांना सांगितले.

खुर्च्यांची मोडतोड, टेबलची काच फोडली..

परंतु पुन्हा जैस्वाल मला म्हणाले, तुमचे काम बंद करा, व आताच्या आता तुमच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना इथे बोलवा, तुम्ही पोलिसवाले शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाच अटक करता,  तुम्ही व तुमचे वरिष्ठ अधिकारी आमच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास देत आहात, असा आरोप करत जैस्वाल यांनी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांना आर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच उद्या शहरामध्ये काय घडते ते बघा अशी धमकी दिली, असे देखील फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.

धमकी देत असतांनाच जैस्वाल यांनी पोलिस ठाण्यातील खुर्च्या फेकून दिल्या, काचेच्या टेबलवर जोरात हात आपटत, पेनच्या स्टॅडने काच फोडली. तेवढ्यात प्रभारी अधिकारी घेरडे पोलिस ठाण्यात आले व त्यांनी देखील प्रदीप जैस्वाल यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. जैस्वाल यांच्या सोबत आलेल्या सात-आठ कार्यकर्त्यांनी देखील त्यांची समजुत काढत त्यांना घेऊन गेले.

दरम्यान या प्रकरणी फिर्यादी पोटे यांच्या तक्रारीवरून प्रदीप जैस्वाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले होते. आज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.एम. भोसले यांना ३५३ व ५०६ कलमांसाठी प्रत्येकी अडीच हजार रुपयांचा दंड व सहा महिन्यांची शिक्षा सुनावली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com