कोरोना जनजागृतीसाठी आमदार धस दोन्ही मुलांसह रस्त्यावर..

कोरोनाचे संक्रमण झाले म्हणून धीर सोडू नका, तुम्हा सर्वांचे सेवेकरी म्हणून धस कुटुंब आपल्या सोबत आहे.
Mla suresh dhas news Beed
Mla suresh dhas news Beed

आष्टी : कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पुढील काही महिने सर्व सामान्य नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. प्रथम प्राधान्य अॅन्टीजन टेस्टची मोहिम वाडी वस्ती, तांडा, गाव येथे राबविली जाणार असल्याने नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन व जनजागृती करत आमदार सुरेश धस व त्यांचे कुटुंबच मैदानात उतरले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, रुग्ण व मृतांची संख्या यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. लोकांच्या मनातील भिती नाहीसी करून त्यांना लक्षण दिसत असतील तर चाचणी करून घेण्याचे आवाहन करण्यासाठी सुरेश धस यांनी आपल्या दोन मुलासंह मतदारसंघात जनजागृती मोहिम सुरू केली आहे. कोरोनाच्या लढाईत संपूर्ण धस कुटुंब तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास देत धस हे त्यांचे दोन्ही मुल जयदत्त व सागर यांच्यासह स्वतः हातात भोंगा घेऊन जनजागृती अभियान राबवत आहेत.

मतदारसंघात कोरोनाचा कहर वाढत असून ही साखळी तोडण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यासाठी धस यांनी शुक्रवारी (ता.२३) सकाळी सात वाजल्यापासून आष्टी मतदारसंघ पिंजून काढला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गणप्रमुख, प्रत्येक गावातील प्रमुख कार्यकर्ता यांनी गाव-तांडा,वाडी-वस्तीवर जाऊन गावकऱ्यांना अँटीजन टेस्ट करण्यासाठी जागृत करत आहेत.

संकोच नको, अचडण सांगा..

हा रोग अंगावर काढण्यासारखा नाही, भीती बाळगू नका, खोकला, सर्दी-ताप, अंगदुखी डोकेदुखी इत्यादी लक्षणे आढळून आल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात अथवा रुग्णालयात जाऊन योग्य तो उपचार घ्या, अशी आर्जव सुरेश धस, आष्टी जयदत्त,पाटोदा तर शिरुर कासार येथे सागर धस करत होते.

भीती न बाळगता आपण अँटीजन टेस्ट करून आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, तुम्हाला कोरोनाचे संक्रमण झाले म्हणून धीर सोडू नका, तुम्हा सर्वांचे सेवेकरी म्हणून धस कुटुंब आपल्या सोबत असून सर्वांसाठी दिवसरात्र आरोग्य प्रशासन,जिल्हा प्रशासनासोबत काम करत आहे.

आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, कुठलाही संकोच न बाळगता अडचण सांगा आमचे कुटुंब तसेच प्रमुख कार्यकर्ते आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहेत, असा धीरही या तिघांनी नागरिकांना दिला. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com