आमदार बंब चार महिन्यानंतर चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर

पोलिसांना सहकार्य करण्याच्या भावनेतून मी आणि अन्य काही सहकारी आम्ही चौकशीसाठी आलो होतो, असेही बंब यांनी स्पष्ट केले.
Bjp Mla Prashant Bamb- Gangapur Sugar Factory News Aurangabad
Bjp Mla Prashant Bamb- Gangapur Sugar Factory News Aurangabad

औरंगाबाद ः गंगापूरचे भाजपा आमदार प्रशांत बंब यांच्यासह १६ जणांविरोधात नाेव्हेंबर २०२० मध्ये गुन्हा दाखल झाला होता. बनावट कागदपत्र तयार करून गंगापूर साखर कारखान्याच्या सभासदांची १५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप प्रशांत बंब यांच्यावर आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आज  चार महिन्यांनी या प्रकरणात आमदार बंब यांच्यासह काही संचालकांची औरंगाबाद पोलिस अधिक्षक कार्यालयात चौकशी करण्यात आली.

गंगापूर सहकारी साखर कारखाना अनेक वर्षांपासून बंद आहे. राज्य सरकारने या कारखान्यावरील कर्जापोटी कारखाना जप्त केलेला आहे. संबंधित बँकेने  हा कारखाना विक्रीस काढल्यानंतर तत्कालीन संचालक मंडळाने या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर गंगापूर न्यायालयात कारखान्याकडून रक्कम जमा करण्यात आली होती. त्यामुळे तेव्हा साखर कारखान्याची विक्री रोखण्यात आली होती.

त्यामुळे न्यायालयाकडून ही रक्कम परत कारखान्याच्या खात्यात जमा करण्यात आली. व्याजासह १५ कोटी ७५ लाख रुपयांपेक्षा अधिक ही रक्कम झाली. प्रशांत बंब व कारखान्यातील काही सभासदांनी एकत्र येत पैशांचा अपहार केल्याचा आरोप झाल्यानंतर बंब व अन्य संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात प्रशांत बंब यांच्यावर गुन्हा दाखल असल्यामुळे त्यांना अटक करून सखोल चौकशी करावी अशी मागणी तक्रारदारांकडून वारंवार केली जात होती.

७ नोव्हेंबर २०२० रोजी कारखान्याला परत मिळालेली रक्कम १५ कोटी ७५ लाख रुपये कारखान्याचे अध्यक्ष आमदार प्रशांत बंब व प्रभारी संचालक बी. एम. पाटील २० जुलै रोजी बेकायदेशीररित्या कारखान्याचे खाते उघडून विविध ठिकाणी टाकण्यात आली होती. खातं उघडत असताना कारखान्याची भागीदारी दाखवण्यात आली. त्यामध्ये आमदार बंब व पाटील हे भागीदार असल्याची बनावट कागदपत्र तयार केली गेली.

नागरी सहकारी बँकेत खातं उघडत असताना जी परवानगी घ्यावी लागते ती घेतली नाही.परत मिळालेली रक्कम कारखाना वित्तीय संस्था नसल्याने व्याज वाटू शकत नाही, असे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

बंब म्हणतात आम्हीच आलो..

बंब हे आमदार असल्यामुळेच पोलिस त्यांची चौकशी करत नसल्याचा आरोप देखील केला जात होता. अखेर चार महिन्यांनी औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधिक्षक कार्यालयाकडून आज दुपारी आमदार बंब व अन्य काही संचालकांची चौकशी करण्यात आली. वरिष्ठ पोलिस अधिकारी भामरे यांनी त्यांची तीन तासाहून अधिक काळ चौकशी केली.  या चौकशीतून काय माहिती समोर आली हे अहवालानंतरच स्पष्ट होईल.

दरम्यान, आमच्यावर राजकीय दबावातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सिल्लेंगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित पोलिसांनी आॅडीट रिपोर्ट आल्यानंतर कारवाई केली जाईल अशी भूमिका घेतली होती. पण नंतर राजकीय दबाव आणून गंगापूर पोलीस ठाण्यात आॅडीट रिपोर्ट नसतांना गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा आमदार बंब यांनी चौकशी नंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना केला.

कुठल्याही प्रकराचा अपहार या प्रकरणात झालेला नाही, मी आमदार असल्यामुळे मला अटक करा, चौकशी करा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. पण पोलिसांना सहकार्य करण्याच्या भावनेतून मी आणि अन्य काही सहकारी आम्ही चौकशीसाठी आलो होतो, असेही बंब यांनी स्पष्ट केले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com