राज्यमंत्र्यांनी ट्रॅक्टर चालवत केली हाइपोक्लोराइडची फवारणी 

ही मोहीम शहरातील प्रत्येक वार्ड, वस्ती, झोपडपट्टीत राबवली जाणार आहे. यासाठी नगरपरिषदेने नियोजनबद्ध आराखडा तयार केला असून त्यानुसार शहराचे चार झोन तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक झोनमध्ये ७५ हातपंप ह्याप्रमाणे ३०० हातपंपाच्या माध्यमातून शहरात हायपोक्लोराइडची फवारणी करण्यात येत आहे.
minister sattar driving tractor news
minister sattar driving tractor news

औरंगाबादः जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला इशारा आणि त्यानूसार जुलै महिन्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी संभाव्य वाढ लक्षात घेता शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आतापासूनच खबरदारी घेत उपाययोजना सुरू केल्या. मतदारसंघातील सिल्लोड शहरात कोरोनाचे सात रुग्ण आढळल्यानंतर याचा प्रादुर्भाव अजून वाढू नये यासाठी संपुर्ण सिल्लोड शहराचे निर्जंतुकीकरण करण्याचा संकल्प सत्तार यांनी हाती घेतला आहे. या उपक्रमाला शहरातून आज सुरूवात करण्यात आली. अब्दुल सत्तार यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत शहरात हायपोक्लोराइडची फवारणी केली.

येत्या जुलै महिन्यात कोरोनाचे वाढते संकट रोखण्यासाठी व खबरदारीचा उपाय म्हणून सिल्लोड नगरपरिषदेने २२ जूनपासून तीन दिवस संपूर्ण शहर निर्जंतुकीकरणासाठी मोहिम हाती घेतली आहे. सिल्लोड कोरोना मुक्त करण्याचा प्रत्येकाने संकल्प करावा, असे आवाहन करत महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्वतः फवारणी करत या मोहिमेला सुरूवात केली. गेल्या आठ दिवसात सिल्लोडमधील तीन जणांना कोरोनाची लागण झाली.

या पार्श्वभूमीवर शहरातील व्यापारी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने २२, २३  व २४  जून असे तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला. जनता कर्फ्युची संधी साधत अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड नगर परिषदेला या तीन दिवसात संपूर्ण शहर निर्जंतुकीकरणासाठी हायपोक्लोराईड व धूर फवारणी अभियान राबविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानूसार शहर निर्जंतुकीकरणाला सुरूवात करण्यात आली असून अब्दुल सत्तार यांनी स्वतः अग्निशामक दलाच्या फायर गनने शहरात हायपोक्लोराइडची फवारणी केली.

शहरातील प्रियदर्शनी चौक भागातून सुरू झालेली ही मोहीम शहरातील प्रत्येक वार्ड, वस्ती, झोपडपट्टीत राबवली जाणार आहे. यासाठी नगरपरिषदेने नियोजनबद्ध आराखडा तयार केला असून त्यानुसार शहराचे चार झोन तयार करण्यात आले  आहेत. प्रत्येक झोनमध्ये ७५ हातपंप ह्याप्रमाणे ३०० हातपंपाच्या माध्यमातून शहरात हायपोक्लोराइडची फवारणी करण्यात येत आहे.

याशिवाय दोन वाहनांच्या माध्यमातून धूर फवारणी तर दोन वाहन व एक अग्निशामक दलाच्या वाहनाने शहरात निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी प्रभागनिहाय पथक प्रमुखाची नियुक्ती करण्यात आली असून यासाठी नगरसेवकांचे सहकार्य देखील घेतले जात आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com