राज्यमंत्री सत्तार यांचा साधेपणा, कार्यालयात केली इफ्तार पार्टी..

कुठल्याही प्रकारचे सार्वजनिक सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास मुख्यमंत्र्यांनी मज्जाव केला आहे.
Minister Abdul Sattar Organise Iftar Party News
Minister Abdul Sattar Organise Iftar Party News

औरंगाबाद ः शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकतेच मतदारसंघातील मुस्लिम समाज बांधवांना रमजान ईद साधेपणाने, गर्दी न करता घरातच साजरी करण्याचे आवाहन केले. (Minister of State Sattar's simplicity, Iftar party held in office) त्यांच्या या आवाहनाचे कौतुकही झाले, पण एकीकडे लोकांना साधेपणाचा उपदेश करणाऱ्या सत्तार यांनी आपल्या संपर्क कार्यालयात मात्र इफ्तार पार्टीचे आयोजन केले. सोशल डिस्टन्स आणि कोरोनाचे सर्व नियम पाळत हे आयोजन करण्यात आल्याचा दावा सत्तार यांच्याकडून करण्यात आला आहे.

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने लाॅकडाऊन व निर्बंधांमध्ये १ जून पर्यंत वाढ केली आहे. कुठल्याही प्रकारचे सार्वजनिक सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास मुख्यमंत्र्यांनी मज्जाव केला आहे. (Many of his party's ministers in the government have come forward to show that these rules are a basket case.) मात्र सरकारमधील त्यांच्या पक्षाच्या अनेक मंत्र्यांकडून या नियमांना केराची टोपली दाखवल्याचे प्रकार समोर आले आहेत.

एमआयएम, भाजप, शिवसेना व अन्य राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर या प्रकरणी गुन्हे देखील झाले आहेत.(Activists of MIM, BJP, Shiv Sena and other political parties have also been charged in the case.) शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी मतदारसंघातील एका पाणीपुरवठा योजनेचे उद्धाटन केले. यावेळी अनावश्यक गर्दी जमवून कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यासह ३० ते ३५ जणांवर गुन्हा देखील दाखल झाला.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दाखल केलेल्या सुमोटो याचिकेत देखील यावर न्यायालयाने पोलिसांना विचारणा केली होती. शिवाय राजकीय पुढाऱ्यांमुळेच कोरोनाचा फैलाव होणार नाही का? असे म्हणत आता आम्हालाच आदेश द्यावे लागतील, अशा शब्दात राज्य सरकारला सुनावले होते.

शिवसेनेचे आणखी एक मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर देखील आरोग्य केंद्राच्या उद्धाटन प्रकरणात गुन्हा दाखल केला का? अशी विचारणा खंडपीठाने केली आहे. एकंदरित कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन केले जावे, असे मत न्यायालयाने देखील नोंदवले आहे.(The court also ruled that the Corona rules should be strictly adhered to.) कोरोना पार्श्वभूमीवर आलेला रमजान साधेपणाने, घरातच साजरा करावा, असे स्पष्ट निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून देखील त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.

इफ्तारला अनेकांची हजेरी..

लोकप्रतिनिधी म्हणून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील दोन दिवसांपुर्वी मतदारसंघ व राज्यातील मुस्लिम समाज बांधवांना या संदर्भात सविस्तर आवाहन केले होते. त्यानंतर मात्र रमाजानच्या पुर्वसंध्येला अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथील आपल्या संपर्क कार्यालयात इफ्तार पार्टीचे आयोजन केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. (He is being criticized for organizing the Iftar party by Sattar himself.) इतरांना साधेपणाचा उपदेश देणाऱ्या सत्तार यांनीच इफ्तार पार्टाचे आयोजन केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे.

अर्थात सत्तार यांच्याकडून इफ्तार पार्टीला मोजक्याच लोकांना आमंत्रित करण्यात आले होते, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. त्यांच्या इफ्तार पार्टीला  जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील, रामुकाका शेळके, जि. प. बांधकाम सभापती किशोर बलांडे, युवानेते अब्दुल समीर, नॅशनल सूतगिरणीचे संचालक अब्दुल आमेर अब्दुल सत्तार, मौली मुसा आदींची उपस्थिती होती. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com