राज्यमंत्री सत्तार `शेठ`यांचा शिवसेनेच्याच साबेर भाईशी `थेट` पंगा..

शिवसेनेचे जुने कट्टर पदाधिकारी साबेर भाई खान आणि अब्दुल सत्तार यांच्यात एका कार्यक्रमात चांगलीच खडाजंगी झाली.
राज्यमंत्री सत्तार `शेठ`यांचा शिवसेनेच्याच साबेर भाईशी `थेट` पंगा..
Minister Abdul Sattar- Saber Khan controversy News Auragabad

औरंगाबाद ः शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे आपल्या फटकाळ स्वभाव आणि समोरच्याची टर उडवण्यासाठी नेहमीच ओळखले जातात. मग ते दुसऱ्या पक्षातील विरोधक असो की स्वपक्षातील, ते कुणाचाही मुलाहिजा बाळगत नाही. (Minister of State Sattar `Sheth`'s` live` mess with Shiv Sena's Saber Bhai) पण कधी कधी त्यांचे असे वागणे अंगलट येते.  असाच काहीसा प्रकार नुकताच वैजापूरमध्ये घडला.

शिवसेनेचे जुने कट्टर पदाधिकारी साबेर भाई खान आणि अब्दुल सत्तार यांच्यात एका कार्यक्रमात चांगलीच खडाजंगी झाली. (State Minister Abdul Sattar, Maharashtra) सत्तार हे काॅंग्रेसमध्ये असतांना विधान परिषद निवडणूकीत साबेर भाई यांनी मुस्लिम असूनही आपल्याला मदत केली नाही, याचा राग सत्तार यांच्या मनात असल्यामुळे ते संधी मिळेल तेव्हा साबेर खान यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीक करत असतात.  

आता तर राज्यमंत्री असल्याने त्यांच्या टीकेची धार अधिकच वाढली आहे. पण साबेर खान यांच्या कानपुरात बिघाड झालेला आहे ही त्यांनी केलेली टीका साबेर भाई यांनी चांगलीच मनावर घेतली, आणि थेट सत्तार यांना याचा कार्यक्रमस्थळी जाऊन जाबच विचारला. मग काय यो दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली आणि याची चर्चा जिल्हा आणि राज्यभरात पसरली.

सत्तार `शेठ` यांना साबेर भाईशी घेतलेला थेट पंगा यावेळी मात्र महागात पडला असेच म्हणावे लागेल. शिवसेनेत जात-पात मानली जात नाही याचेच उदाहरण म्हणजे गेल्या वीस वर्षापासून साबेर भाई खान हे वैजापूर तालुक्यात शिवसेनेचे काम निष्ठेने करत आहेत. पक्षाने देखील त्यांना नगराध्यक्ष पदासह विविध ठिकाणी संधी देत त्यांचा योग्य सन्मान केला. साबेर भाई हे वैजापूर तालुक्याच्या राजकारणातील एक मोठे नाव म्हणून ओळखले जाते.

शिवसेनेचे माजी आमदार आर.एम.वाणी यांच्यासोबत त्यांनी तालुक्यात शिवसेनेला मजबूत करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. सध्या ते विद्यमान उपनगराध्यक्ष देखील आहेत. लोकसभा,विधानसभा, नगरपरिषद व अन्य निवडणुकीत मुस्लिम समाजाची बऱ्यापैकी मते शिवसेनेला मिळतात ती साबेर भाई यांच्यामुळेच असेही बोलले जाते.

तर त्याचे झाले असे, की राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे काल वैजापूरात आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते एका मेडिकल व अॅटोमोबाईल शाॅपचे उद्घाटन झाले. आपल्या समर्थकांसमोर बोलतांना सत्तार यांना जरा जास्तच हुरूप आला आणि त्यांनी साबेर खान यांचा उल्लेख करत त्यांच्या कानपुरात बिघाड झाला आहे, म्हणजे त्यांना कानाने कमी ऐकू येते अशी टीका केली. विशेष म्हणजे सत्तार यांनी याआधी देखील अशाच प्रकारची टीका साबेर खान यांच्यावर केली होती.

साबेर भाई थेट कार्यक्रमस्थळी ..

सत्तारांचा हा खोडसाळपणा साबेर खान यांच्या कानावर घातला, तसे ते  आपल्या समर्थकांसह सत्तारांचा कार्यक्रम सुरू असलेल्या ठिकाणी पोहचले. सर्वासमक्ष त्यांनी सत्तार यांना थेट जाब विचारला. तुम्ही मंत्री असाल पण बोलतांना नीट विचारपूर्वक आणि कोणाबद्दल बोलतोय याचा विचार करत जा, मी देखील माझ्या तालुक्याचा शेरच आहे. तुम्ही आता शिवसेनेत आला आहात, मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे, अशा शब्दांत साबेर भाईंनी सत्तार यांना सुनावले.

हा प्रकार पाहून दोघांचेही समर्थक आक्रमक झाले. तेव्हा सत्तार यांनी नमते घेत साबेर भाई तुम्ही शेर नाही, सव्वाशेर आहात, असे म्हणत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. पण संतापलेल्या साबेर भाई यांनी आपल्या अशाप्रकारच्या वक्तव्य आणि शिवसैनिकाला दिल्या जाणाऱ्या वागणुकीची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे करण्याचा इशारा दिला. आता साबेर भाई एवढ्यावरच थांबतात की मग सत्तार यांची तक्रार उद्धव ठाकरे यांच्याकडे करतात हे लवकरच स्पष्ट होईल.SSहे ही वाचा ः जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन् माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकमेकांसमोर येतात..

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in