औरंगाबादने एमआयएला महाराष्ट्रातील पहिला खासदार दिला, आता महापालिकेत महापौरही आमचाच..

एमआयएमला मिळत असलेले यश आता अनेकांच्या डोळ्यात खुपायला लागले आहे. त्यामुळे अनेक पक्ष एमआयएमला संपवण्याची भाषा करत आहेत.
Mim Imtiaz Jalil- Municipal Corporation Mayor News Aurangabad
Mim Imtiaz Jalil- Municipal Corporation Mayor News Aurangabad

औरंगाबाद ः शहराने एमआयएमच्या स्थापनेपासूनच खूप प्रेम दिले, त्यामुळे महापालिकेच्या पहिल्याच निवडणूकीत आपले २६ नगरसेवक निवडून आले. त्यानंतर तुम्ही एक आमदार आणि आता राज्यातील एकमेव खासदार म्हणून मला निवडून दिले. (MIM's only MP from Maharashtra was given by Aurangabad, now the mayor is also ours.) तुमचे प्रेम आणि साथ अशीच कायम राहिली, तर एमआयएमचा राज्यातील पहिला महापौर देखील याच औरंगाबादमधून होईल, असा दावा खासदार इम्तियाज जलील यांनी केला.

शहरातील विकासकामांच्या उद्घाटना निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महापालिका निवडणूका येत्या सहा महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  (AIMIM MP Imitaz Jalil) त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम केलेल्या एमआयएमने देखील मुस्लिमबहुल भागांमध्ये विकासकामांचा धडाका सुरू केला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर औरंगाबाद महापालिकेतील शिवसेना-भाजपची युती २५ वर्षानंतर संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर एमआयएमने अधिक जोर लावत आपल्या नगरसेवकांची संख्या वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. आरेफ काॅलनीतील विकासकामांच्या उद्घाटनासाठी आलेल्या खासदार इम्तियाज जलील यांनी तर पुढचा महापौर एमआयएमचा असेल असा दावाच केला.

इम्तियाज जलील म्हणाले, एमआयएमला या शहरातील नागरिकांनी भरभरून यश दिले. आमच्यावर जातीयवादी पक्ष अशी टीका केली गेली, पण सर्व धर्मीय व समाजाची  कामे करून आम्ही हा आरोप खोडून टाकला आहे. आज मुस्लिम वार्डांमध्ये जी कामे केली जातात, तशीच कामे हिंदू वसाहतींमध्ये देखील आम्ही करतो. म्हणूनच येथील केवळ मुस्लिमच नाही तर दलित व हिंदू बांधवांनी देखील लोकसभा निवडणुकीत एमआयएमला मतदान केले.

यामुळेच महाराष्ट्रातील एकमेव खासदार म्हणून निवडून जाण्याचा मान मला मिळाला. त्या आधी आमदार आणि महापालिकेत २६ नगरसेवक निवडून देत तुम्ही एक मजबुत विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी एमआयएमला दिली. एमआयएमला मिळत असलेले यश आता अनेकांच्या डोळ्यात खुपायला लागले आहे. त्यामुळे अनेक पक्ष एमआयएमला संपवण्याची भाषा करत आहेत.

औरंगाबादकरांचा आमच्यावर विश्वास..

पण तुमची भक्कम साथ असल्यामुळे विरोधकांचे मनसुबे कधीच पुर्ण होणार नाही. महापालिका असो की आमदार असतांना विधानसभेत आपण सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नावर लढत आलो आहोत. हे करत असतांना कधी भेदभाव केला नाही. त्याची पावती म्हणूनच लोकसभा निवडणूकीत जनतेने एमआयएमला भरभरून मतदान केले. पक्षाचे अध्यक्ष असदोद्दीन ओवोसी यांच्यावर येथील जनतेने विश्वास दाखवला आहे.

या जोरावरच जसं तुम्ही महाराष्ट्रातून एमआयएमचा पहिला खासदार म्हणून मला निवडून दिलं, तसेच येणाऱ्या महापालिका निवडणुकी एमआयएमचा पहिला महापौर होण्याचा मान देखील आपणच मिळवू, येणाऱ्या महापालिका निवडणुकीनंतर इथे एमआयएमचाच महापौर होईल, असा विश्वास आणि दावा देखील इम्तियाज जलील यांनी केला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com