एमआयएमचा हेतू वाईट नाही;क्रिडा विद्यापीठासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार..

हे क्रिडा विद्यापीठ बालेवाडीला नेण्याचा निर्णय झाला, तेव्हा मी देखील विधानसभेत त्या विरोधात आवाज उठवला होता.
एमआयएमचा हेतू वाईट नाही;क्रिडा विद्यापीठासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार..
Shivsena Mla Sanjay Sirsat News Aurangabad

औरंगाबाद ः जिल्ह्याला मिळालेले मराठवाडा क्रिडा विद्यापीठ पुण्याच्या बालेवाडीला हलवण्यात आल्याचा निषेध म्हणून एमआयएमने आंदोलन केले. ध्वजारोहणासाठी आलेल्या पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या वाहनांच्या ताफ्याला आंदोलकांनी काळे झेंडे देखील दाखवले. (MIM's intentions are not bad; I will talk to the Chief Minister for a sports university.) आंदोलनामागे एमआयएमचा हेतू वाईट नाही, मराठवाड्याला मिळालेले क्रिडा विद्यापीठ आपल्यालाच मिळावे, ही त्यांची भूमिका योग्यच आहे. त्यामुळेच मी या आंदोलकांची भेट घेतली.

मराठवाड्याच्या विकासाचा प्रश्न येतो तेव्हा पक्षभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे लढले पाहिजे, ही माझी देखील भावना आहे. (Mim Protest for Sport Univercity, Aurangabad) त्यामुळे क्रिडा विद्यापीठ औरंगाबादलाच व्हावे, या मागणीसाठी आपण देखील मुख्यमंत्र्यांशी बोलू आणि तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचवू, असे आश्वासन शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी दिले. पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची शिरसाट यांनी भेट घेतली.

यावेळी वापस दो वापस दो,क्रिडा विद्यापीठ वापस दो, अशा घोषणा एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. या गदारोळातच शिरसाट यांनी आंदोलकांची भेट घेतली. (Shivsena Mla Sanjay Sirshat, Aurangabad) संजय शिरसाट म्हणाले, एमआयएमचे आंदोलन करण्यामागचा हेतू वाईट नाही, एका चांगल्या प्रश्नासाठी ते आंदोलन करत आहेत. त्यामुळे आमचे पक्ष जरी वेगळे असले तरी विकासाच्या मुद्यावर आम्ही एकत्रित आहोत, हे मी त्यांना सांगू इच्छितो.

क्रिडा विद्यापीठ महत्वाचे..

क्रिडा विद्यापीठ औरंगाबादला मिळाले होते, माझ्याच मतदारसंघात ते होणार होते. जेव्हा हे क्रिडा विद्यापीठ बालेवाडीला नेण्याचा निर्णय झाला, तेव्हा मी देखील विधानसभेत त्या विरोधात आवाज उठवला होता. औरंगाबाद व मराठवाड्याच्या विकासात हे क्रिडा विद्यापीठ महत्वाचे पाऊल ठरणार होते. त्यामुळे ते औरंगाबादलाच व्हावे, अशी आग्रही भूमिका माझी देखील आहे.

त्यामुळे येणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे मी निश्चित आपल्या भावना पोहचवणार आहे. औरंगाबादला मिळालेले क्रिडा विद्यापीठ इथेच व्हावे, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू, असेही शिरसाट यांनी आंदोलनकांना सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in