दारूवरील कर वाढवल्याबद्दल एमआयएमच्या खासदाराने मानले राज्य सरकारचे आभार

दारूमुळे घरकाम करणाऱ्या महिला व त्यांच्या कुटुंबाची कशी वाताहत होते हे आपण आपल्याकडे कामाला असलेल्या महिलेच्या अनुभावरून पाहिल आहे, असे म्हणत इम्तियाज जलील यांनी अगदी आमदार असतांना शहरातील देशी दारू दुकानांच्या विरोधात आंदोलन छेडले होते.
Mim Mp Imtiaz Jalil- Congratulat To State Government News- Aurangabad
Mim Mp Imtiaz Jalil- Congratulat To State Government News- Aurangabad

औरंगाबाद ः नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारने देशी-विदेशी दारूच्या करात भरभसाट वाढ केली. यावरून कोरोना काळात ज्यांनी राज्याची अर्थव्यवस्था सांभाळली त्यांनाच अर्थमंत्र्यांनी दणका दिल्याचे मीम्स देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. राज्य सरकारच्या या निर्णयाचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मात्र स्वागत केले. एवढेच नाही तर देशी दारूवर करवाढ केल्याबद्दल आभार देखील मानले आहेत.

महाराष्ट्रातील एमआयएमचे एकमेव खासदार इम्तियाज जलील हे सोशल मिडियावर सर्वाधिक सक्रीय म्हणून ओळखले जातात.राज्य तसेच देशपातळीवरील घडामोडींवर ते आपले परखड मत फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून नेहमी मांडत असतात. अनेकदा त्यांना ट्रोल केले जाते, त्यांच्यावर टीकाही होते. राज्याच्या अर्थसंकल्पात मद्यविक्रीवर प्रचंड प्रमाणात करवाढ करण्यात आली आहे. यावर देखील इम्तियाज जलील यांनी ट्विट करत सरकारचे आभार मानले आहे.

दारूमुळे घरकाम करणाऱ्या महिला व त्यांच्या कुटुंबाची कशी वाताहत होते हे आपण आपल्याकडे कामाला असलेल्या महिलेच्या अनुभावरून पाहिल आहे, असे म्हणत इम्तियाज जलील यांनी अगदी आमदार असतांना शहरातील देशी दारू दुकानांच्या विरोधात आंदोलन छेडले होते. नशाबंदीच्या नावाखाली नागरीवस्त्या, धार्मिक स्थळे किंवा नागरिकांची वर्दळ असलेल्या आणि स्थानिकांचा विरोध असलेल्या दारू दुकानाविरुद्ध आक्रमक पावित्रा घेत ते बंद पाडले होते.

कोरोना काळात दारू विक्रीला सुट दिल्यानंतर तिथे कोरोना नियम कसे पायदळी तुडवले जात आहेत, दारू घेण्यासाठी लांब रांगा कशा लागल्या आहेत, याचे व्हिडिआो देखील इम्तियाज जलील यांनी सोशल मिडियावर शेअर केले होते. त्यामुळे अर्थसंकल्पात जेव्हा देशी, विदेशी दारूच्या करात वाढ करण्यात आल्याचे समजले तेव्हा त्यांनी मुक्तकंठाने राज्य सरकारची स्तुती केली.

या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये इम्तियाज जलील म्हणतात, देशी दारूवरचा कर वाढवल्या बद्दल मी महाराष्ट्र सरकारचे आभार मानतो. त्यांनी दारूवरील कर इतके वाढवावेत की दिवसभराची कमाई घरी घेऊन जाणारा व्यक्ती त्या दुकानावर थांबता कामा नये.  दिवसदिवसभर दारू दुकांनासमोर उभे राहून आपल्या लेकराबाळांच्या तोंडातला घास दारूत उडवणाऱ्यांच्या अवाक्याबाहेर दारू जाईल एवढे दर वाढवा. जेणेकरून दारूच्या दुकानात प्रवेश करणाऱ्यांची संख्या घटेल.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com