आमचा करोडोंचा माल पडून, ऑनलाइन विक्रीला सूट हे चालणार नाही..

देशात जेव्हा पहिला लाॅकडाऊन पंतप्रधानांनी घोषित केला होता. तेव्हा व्यापाऱ्यांना पुर्वतयारीसाठी अवधी दिला होता. तसाच राज्य सरकार व मुख्यमंत्री देतील.
Aurangabad District Merchent Association Demand News
Aurangabad District Merchent Association Demand News

औरंगाबाद :  येत्या दोन दिवसांत राज्यात लाॅकडाऊन लागण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता व्यापाऱ्यांना आपली दैनंदिन कामे, जीएसटी, कर भरणा, कर्मचाऱ्यांचे पगार, मालाची व्यवस्था इतर कामासांठी दोन दिवसांची सूट द्यावी, अशी अपेक्षा आणि मागणी आम्ही प्रशासनाकडे केली होती. आज शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली पण पोलिसांना दडपशाही करून ती बंद करायला लावली. आम्ही प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. संपुर्ण लाॅकडाऊन झाला तर आम्ही त्यात सहभागी होऊ, पण पोलिस किंवा प्रशासनाने विनाकारण व्यापाऱ्यांना त्रास देऊ नये, अशी अपेक्षा जिल्हा व्यापारी महासंघाने व्यक्त केली आहे.

लाॅकडाऊनमुळे आमच्या दुकानांमध्ये कोट्यावधींचा माल पडून आहे, पण दुसरीकडे मोठ्या मल्टी नॅशनल कंपन्यांना मात्र ऑनलाइनच्या नावाखाली सुटू दिली जात आहे. त्यांच्या व्यवसाय चार-पाच पटीने वाढतो आहे. ही भेदभाव सरकारने करु नये. लाॅकडाऊनमध्ये आमची दुकाने बंद राहणार असतील तर आॅनलाईन विक्री देखील बंद ठेवायला हवी, अशी मागणी देखील व्यापारी महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी केली आहे.

ब्रेक द चेन अंतर्गत जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लावून शहरातील किराणा व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाना बंद ठेवण्याचे आदेश दिले. या विरोधात केवळ औरंगाबादच नाही तर मराठवाडा व राज्यातील इतर भागातील व्यापारी देखील रस्त्यावर उतरला होता. आता येत्या १४ तारखेपासून राज्यात संपुर्ण लाॅकडाऊनची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी प्रशासनाकडे काही मागण्या केल्या आहेत. लाॅकडाऊनची पुर्व तयारी म्हणून दोन दिवस दुकाने उघडण्याची मुभा द्यावी, व्यापारी सहकार्य करण्यास तयार असल्यामुळे त्यांना त्रास देऊन दडपशाही करू नये. लाॅकडाऊनमध्ये सर्व दुकाने जशी बंद ठेवण्यात येणार आहे, तशीच बंदी किंवा तेच नियम ऑनलाइन  विक्रीसाठी देखील लागू करावेत.

देशात जेव्हा पहिला लाॅकडाऊन पंतप्रधानांनी घोषित केला होता. तेव्हा व्यापाऱ्यांना पुर्वतयारीसाठी अवधी दिला होता. तसाच राज्य सरकार व मुख्यमंत्री देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. बंद करायचेच असेल तर सगळे बंद करा, व्यापारी महासंघ लाॅकडाऊनला निश्चित पाठिंबा देईल, असेही काळे यांनी सांगितले.

Edited By : jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com