व्यापाऱ्यांनी हार घातले, पोलिसांनी गुन्हा दाखल केला; इम्तियाज जलील यांना अरेरावी भोवली..

पोलिसांनी इम्तियाज जलील यांच्यासह २५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
Mp Imtiaz Jalil and 25 others file fir News Aurangabad
Mp Imtiaz Jalil and 25 others file fir News Aurangabad

 औरंगाबाद ः शहरातील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांच्या दुकानांना लावलेले सील काढून, त्यांना लावलेला भरमसाठ दंड कमी करा, या मागणीसाठी खासदार इम्तियाज जलील व काही व्यापारी काल कामगार उपायु्क्त कार्यालयात गेले होते. (There was a lot of fighting between Imtiaz Jalil and the Deputy Commissioner.) तिथे इम्तियाज जलील व उपायुक्त यांच्यात बरीच खडाजंगी झाली. यावेळी या सगळ्या प्रकाराचे व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या हाताला झटका देवून, तुम्ही इथून बाहेर निघून जा, अशी भाषा वापरत इम्तियाज जलील यांनी अपमान केला.

कामगार उपायुक्त यांना तू इथे कशाला बसला आहे, कामगारांसाठी ना, कलेक्टर कलेक्टर काय करतो, ते काय देव आहे का? जोपर्यंत कामगारांचा दंड कमी करत नाही तोपर्यंत तुला इथून उठू देणार नाही, असे म्हणत २५ ते ३० व्यापाऱ्यासह गोंधळ घातला होता. (The merchants gave up, the police filed charges; Imtiaz Jalil was surrounded by Arrogancy) या प्रकरणी कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांच्या तक्रारीवरून क्रांतीचौक पोलिसा ठाण्यात इम्तियाज जलील यांच्यासह २५ जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळ आणला म्हणून  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर कडक निर्बंध असतांना दुकाने सुरू ठेवणाऱ्या ६६ व्यापारी व छोट्या दुकानदारांवर सील लावण्याची कारवाई करण्यात आली होती. (A hearing was held in the office of the Deputy Commissioner of Labor on Tuesday regarding 56 sealed shops.) १ जून पासून निर्बंध शिथील करून सकाळी सात ते दुपारी २ पर्यंत सर्व प्रकारची दुकाने खुली करण्याची परवानगी प्रशासनाने दिली. त्यामुळे सील लागलेल्या ५६ दुकानाच्या संदर्भात मंगळवारी कामगार उपायुक्त कार्यालयात सुनावणी होती.

दोनशे रुपये प्रति स्क्वेअर फूट दराने दंड आकारल्यामुळे संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्याकडे धाव घेत मदतीची मागणी केली होती. त्यानूसार दुपारी साडेबाराच्या सुमारास इम्तियाज जलील उपायुक्तांच्या दालनाता दाखल झाले होते. यावेळी तिथे व्यापाऱ्यांची देखील मोठी गर्दी झाली होती. यावेळी आक्रमक झालेल्या खासदारांची कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांच्याशी चांगलीच खडाजंगी झाली.  

गर्दी व तणाव वाढल्यामुळे तिथे पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानूसार गर्दी व तेथील प्रकाराचे व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्यास इम्तियाज जलील यांनी चित्रीकरण करण्यापासून मज्जाव करत त्यांच्या हाताला झटका दिल्याचे व अपमानास्पद वागणूक देत बाहेर निघून जाण्यास सांगितले. उपायुक्तांच्या दालनात हा प्रकार बराच वेळ सुरू होता.

कामगार उपायुक्तांनीच केली तक्रार दाखल

इम्तियाज जलील हे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याशी बोलले आणि त्यानंतर व्यापाऱ्यांच्या दुकानांचे सील काढण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांनी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात स्वतः जाऊन इम्तियाज जलील व इतरांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणत धमकावल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी इम्तियाज जलील यांच्यासह २५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

कोरोना काळात नियम पायदळी तुडवत गर्दी जमवल्या प्रकरणी इम्तियाज जलील यांच्या विरोधात यापुर्वीच सिटीचौक पोलिस ठाण्यात  एक गुन्हा दाखल आहे. आता सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी त्यांच्यावर क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे दुकानांना लागलेले सील इम्तियाज जलील यांच्यामुळे निघाले म्हणून व्यापाऱ्यांनी त्यांचा भलामोठा हार घालून सांयकाळी स्वागत केले होते. एकीकडे व्यापाऱ्यांनी हार घातला तर दुसरीकडे पोलिसांनी गुन्हा दाखल केला, यामुळे याची शहरात चर्चा सुरू आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com