राष्ट्रवादीच्या इशाऱ्यानंतर राज्यपालांच्या बैठकीचे ठिकाण बदलले..

जिल्ह्यातील महत्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक कृषी विद्यापीठातील विश्रामगृहात घेण्यात आली.
राष्ट्रवादीच्या इशाऱ्यानंतर राज्यपालांच्या बैठकीचे ठिकाण बदलले..
Governor Bhgatsingh Koshiyari news Parbhani

परभणी : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार होते. परंतू यावरून वादंग निर्माण झाले, पुन्हा राज्यपाल विरुध्द राज्य सरकार असा वाद समोर येत होता. (The meeting place of the governor was changed after the warning of the NCP.) त्यातच राष्ट्रवादी कॉग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी राज्यपालांच्या दौऱ्यात आंदोलनाचा ईशाराही दिला होता. या पार्श्वभूमीवर अखेर राज्यपालांच्या बैठकीचे स्थान बदलण्यात आले.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा परभणीसह हिंगोली व नांदेड येथील दौरा सुरुवातीपासून वादात सापडला आहे. (Governor Bhgatsingh Kosyari, Maharashtra) नांदेड येथील अल्पसंख्याक मुला- मुलींच्या वसतीगृहाच्या उदघाटनावरून वादाची ठिणगी पडली होती.

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यपालांच्या या उदघाटन कार्यक्रमाला विरोध दर्शविला होता. त्याच बरोबर राज्यपालांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेण्यासही राष्ट्रवादी कॉग्रेसचा विरोध होत होता.

त्यावरून गेल्या दोन दिवसापासून हा वाद वारंवार समोर येत होता. नांदेड येथील दौऱ्यातील नियोजित उदघाटनाचा कार्यक्रम रद्द केल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शुक्रवारी हिंगोली व परभणी जिल्ह्याचा दौरा सुरु केला. परभणी येथील दौऱ्या दरम्यान सुरुवातीला राज्यपाल जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतू यावरूनही राष्ट्रवादी कॉग्रेसने रान उठविले होते.

राष्ट्रवादी कॉग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलनाचा इशारा देत राज्यपालांना काळे झेंडे दाखवण्याची धमकी दिली होती. त्यामुळे राज्यपालांची जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजित बैठक रद्द करून ती कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयाच्या विश्रामगृहात घेण्यात आली.

प्रसिध्दी माध्यमे बैठकीपासून दुरच

जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील महत्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक कृषी विद्यापीठातील विश्रामगृहात घेण्यात आली. यावेळी ठरावीक अधिकाऱ्यांनाच आत बोलवाण्यात आले. परंतू प्रसिध्दी माध्यमांना बैठक स्थळापासून बरेच दुर ठेवण्यात आले होते.

Edited By : Jagdish Pansare
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in