वैैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या लातूरला कोरोनाचा विळखा, तरी राजकीय आंदोलनांचा सुकाळ

राजकीय पक्षांचा बेफिकरीपणा समोर आला आहे. विरोधकांना कोरोना नियमांचा विसर पडला असला तरी यात सत्ताधारी काॅंग्रेस देखील मागे नाही.
Congress Minister Amit Deshmukh- Latur News
Congress Minister Amit Deshmukh- Latur News

लातूर : मराठवाड्यासह राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या लातूर जिल्ह्याला कोरोनाने अक्षरशः विळखा पडला आहे. दररोज जिल्ह्यात पाचशेवर कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, जिल्ह्यात लाॅकडाऊन सदृश परिस्थिती असली तरी याचे राजकीय नेते व पक्षांना मात्र भान राहिलेले नाही. जिल्ह्यात दररोज सत्ताधारी, विरोधी पक्षांकडून कुठे न कुठे आंदोलनं सुरू आहे. बंदी असतांनी ती झुगारून ही आंदोनल सुरू असल्यामुळे राजकीय नेत्यांना कोरोनाचे गांभीर्य नाही का? असा प्रश्न पडतो.

राज्यात व मराठवाड्यात कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. रुग्णांची संख्या वाढत असतांना मृतांचे प्रमाण देखील धडकी भरवणारे आहे. प्रशासनाकंडून वारंवार कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम, आंदोलन, सभांवर बंदी असतांना लातूरात मात्र हे बंदी आदेश झुगारले जात आहेत. यात विरोधकांप्रमाणेच सत्ताधारी देखील आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

नेत्यांना कोरोनापेक्षा आंदोलनाचे विषय महत्त्वाचे वाटत असून यात मास्क व सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवला जात आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी जमावबंदी, आंदोनल बंदीचे आदेश जारी केले आहेत. असे असताना भाजपा, काँग्रेस, प्रहार, मनसे आदी पक्षांच्या नेत्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी आंदोलने केली. 

या आंदोलनात प्रमाणापेक्षा जास्त लोक जमवून कोरोना नियमांना केराची टोपली दाखवण्णेात आली. उदगीर व पानगाव इथं आठवडी बाजार देखील भरवण्यात आले. या शिवाय अहमदपूर इथं भाजपच्या वतीने रास्ता रोको, मनसेचे चाकूल येथील तहसील कार्यालयावर आंदोलन, 

प्रहार संघटनेचे रेणापूर इथं शोले स्टाईल आंदोलन, भाजपचे लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनाने राजकीय पक्षांचा बेफिकरीपणा समोर आला आहे. विरोधकांना कोरोना नियमांचा विसर पडला असला तरी यात सत्ताधारी काॅंग्रेस देखील मागे नाही.

केंद्र सरकारच्या विरोधात काल काॅंग्रेसचे आमदार धिरज देशमुख यांच्या उपस्थितत देखील उपोषण करण्यात आले. यावेळी देखील अनेकजण विनामास्क आणि सोशल डिस्टन्स पाळत नसल्याचे समोर आले होते. प्रशानाने या आंदोलनाची दखल घेऊन आंदोलकावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असले तरी एका मागून एक आंदोलने सुरूच आहेत. 

लातूर जिल्ह्यात शहरी भागात ५० % तर ग्रामीण भागात ५० % रुग्णासंख्या आहे नागरिकांनी मास्क व सोशल डिस्टन्सच्या नियमाचे पालन करण्याचं आवाहन केले आहे तरी देखील कोरोनाचा आलेख काही कमी होताना दिसत नसल्याने सध्याला प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत.

तरीही बेफिकीर नागरिक बाजारात अद्यापही विनामास्क फिरतांना आढळत आहेत, तर बाजारात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याची काही ठिकाणी पहायला मिळाले. लातूर शहर लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असून अशीच स्थिती कायम राहिली तर लातुरात लॉकडाऊन नक्कीच लावावे लागेल असे जिल्हाधिकारी, पृथ्वीराज बी.पी. यांनी स्पष्ट केले आहे

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com