विद्यार्थ्यांच्या प्रश्नांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री बेजार..

तुम्ही वैद्यकीय शिक्षणमंत्री आहात, परीक्षेवर बोला, आम्ही भावी डॉक्टर आहोत, आम्हाला कोरोना झाला तर कोण जबाबदार, मेडीकलच्या परीक्षा रद्द करा अशा मेसेजचा संपुर्ण पत्रकार परिषदेत अक्षरशः भडीमार सुरू होता. एवढेच नाही तर पत्रकार परिषद सुरू असतांना अमित देशमुख यांच्या मोबाईलवर देखील अनेक मेसज पाठवले जात होते.
minister amit deshmukh press conference news
minister amit deshmukh press conference news

औरंगाबादः लातूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थीतीचा आढावा घेण्यासाठी आज पालकमंत्री तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी लाईव्ह पत्रकार परिषद घेतली. कोरोना आढावा व त्यावरील उपाय योजनांसोबतच वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी वैद्यकीय परीक्षांबद्दल काही तरी सांगावे, अशी अपेक्षा व्यक्त करत मेडीकलच्या विद्यार्थ्यांनी अमित देशमुख यांच्या लाईव्ह पत्रकार परिषदेवर अक्षरशः प्रश्नांचा भडीमार केला.

कॉमेंट बॉक्समध्ये सर्वाधिक विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये देखील या विद्यार्थ्यांची संख्याच अधिक होती. प्रत्येक विद्यार्थी हा मेडिकलच्या परीक्षा रद्द करा, अशी मागणी मेसेजद्वारे करत होता. विशेष म्हणजे अमित देशमुख यांच्या मोबाईलवर देखील शेकडो मेसेज पत्रकार परिषदे दरम्यान धडकत असल्याने ते बेजार झाले होते.

लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. शिवाय मृतांची संख्या देखील वाढते आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन अमित देशमुख यांनी बैठकीतील चर्चा व झालेल्या निर्णयांची माहिती दिली.

या लाईव्ह पत्रकार परिषदेत त्यांनी आतापर्यंत जिल्ह्यात ४२६ कोरोनाचे रुग्ण आढळले असून २४ जणांचा यामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले. शहरातील कोरोना रुग्णांचा प्रवासाचा इतिहास, मृतांमध्ये बहुतांश रुग्ण हे हायपर टेन्शन, शुगर किंवा इतर आजाराने दगावल्याचे, तसेच त्यांचे वय ६० वर्षाहून अधिक असल्याचेही स्पष्ट केले.

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शहरात पुन्हा लॉकडाऊन करावा का? या प्रश्नावर देखील त्यांनी आता दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत, त्याला पुन्हा लॉकडाऊन करून थांबवणे योग्य ठरणार नाही, उलट लोकांनी योग्य ती काळजी घेत आपले व्यवहार सुरू ठेवले पाहिजेत, असे आपले वैयक्तिक मत असल्याचे सांगतिले.

प्रशासनाने लॉकडाऊन केला तर का? केला, नाही केला, तर का नाही केला? असे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे जिल्हाधिकारी, पोलीस, महापालिका, जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागाचे जे अधिकारी, कर्मचारी फ्रंटवर लढत आहे, त्यांचा जो अनुभव किंवा अभ्यास आहे, त्यानूसार निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले असल्याचेही अमित देशमुख यांनी सांगितले.

पाऊण तासांत शेकडो मेसेज..

अमित देशमुख यांची ही पत्रकार परिषद लाईव्ह असल्याने ४५ मिनिटांच्या या पत्रकार परिषदेत मेडीकलच्या शेकडो विद्यार्थ्यांनी फेसबुकच्या माध्यमातून अमित देशमुख यांनी वैद्यकीय परीक्षा रद्द करा, अशी मागणी करणारे मेसेज टाकले. तुम्ही वैद्यकीय शिक्षणमंत्री आहात, परीक्षेवर बोला, आम्ही भावी डॉक्टर आहोत, आम्हाला कोरोना झाला तर कोण जबाबदार, मेडीकलच्या परीक्षा रद्द करा अशा मेसेजचा संपुर्ण पत्रकार परिषदेत अक्षरशः भडीमार सुरू होता. एवढेच नाही तर पत्रकार परिषद सुरू असतांना अमित देशमुख यांच्या मोबाईलवर देखील अनेक मेसज पाठवले जात होते. त्यामुळे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत असतांना अमित देशमुख सारखे मोबाईलवरील मेसेज पाहत होते.

पत्रकारांनी शेतकऱ्यांपासून ते कोरोनासाठीच्या इंजेक्शनपर्यंतचे प्रश्न अमित देशमुख यांना विचारले. पण मेडीकल परीक्षे संदर्भात एकही प्रश्न विचारला नाही, यावर देखील जे मेडीकलचे विद्यार्थी लाईव्ह पत्रकार परिषद पाहत होते, त्यांनी मेडीकल परीक्षेचा प्रश्न विचारा, अशा सूचना देखील मेसजच्या माध्यमातून केल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com