मायावतींनी रिपाइंत यावे, त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करू; रामदास आठवलेंची ऑफर

आठवले यांनी उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायवती, भीम आर्मीचे चंद्रशेखर यांना दिली आहे. आठवले यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून ट्विट करत ही ऑफर दिली आहे.
Central Minister Ramdas Athawale Offer Ex Up CM Mayawati News
Central Minister Ramdas Athawale Offer Ex Up CM Mayawati News

औरंगाबाद ः रिपब्लिकन पक्ष हा डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे, त्यामुळे जे लोक स्वःतला आंबेडकरवादी मानतात त्यांनी रिपाइंत आले पाहिजे, असे आवाहन करतांनाच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी थेट उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनाच रिपाइंत येण्याची ऑफर  दिली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचे आश्वासनही ट्विटरच्या माध्यमातून दिले आहे.

रामदास आठवले हे आपल्या मिश्किल स्वभाव व शीघ्र कवितेसाठी प्रसिध्द आहेत. पॅंथर चळवळीत त्यांनी केलेले काम यामुळे महाराष्ट्र व देश त्यांना ओळखतो. महाराष्ट्रात सत्ता असेल त्या पक्षासोबत ते असतात हा आतापर्यंतच इतिहास राहिलेला आहे. सध्या देखील त्यांनी आपल्या रपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा केंद्रातील मोदी सरकारला पाठिंबा देत मंत्रीपद मिळवले आहे.

राज्य किंवा देशाच्या राजकारणात जेव्हा एखादा मोठा नेता किंवा पदाधिकारी पक्षांतर करतो तेव्हा रामदास आठवलेंकडून त्याला रिपाइंत येण्याची ऑफर  नसेल तर नवलच.  अशीच ऑफर  आठवले यांनी उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायवती, भीम आर्मीचे चंद्रशेखर यांना दिली आहे. आठवले यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून ट्विट करत ही ऑफर  दिली आहे.

रामदास आठवले आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, रिपब्लिकन पक्ष हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे. त्यामुळे जे लोक स्वतःला आंबेडकरवादी मानतात त्यांनी रिपाइंत आले पाहिजे. माजी मुख्यमंत्री मायावती यांनी आणि भीमआर्मीचे चंद्रशेखर आझाद यांनी रिपाइंत यावे. बहन मायावती या आरपीआय मध्ये आल्यास त्यांना रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष करू.

आठवले यांच्या या ट्विटची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. मायावती किंवा चंद्रशेखर आझाद यांच्याकडून याबद्दल कुठलीही प्रतिक्रिया आलेली नसली तरीई अनेकांनी आठवले यांना तुम्हीच आरपीय सोडून नवा पक्ष काढा असा खोचक सल्ला देखील दिला आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com