एकाच सरणावर आठ कोरोना मृतांवर सामुहिक अंत्यसंस्कार

कोरोनाने राज्यासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना विळखा घातला आहे. कोरोनाची दुसरी लाट ही अधिक घातक आणि जीवघेणी असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
Corona News- Ambajogai- Beed
Corona News- Ambajogai- Beed

अंबाजोगाई : कोरोनाचा धोका आणि त्याचे भयंकर परिणाम याचे विदारक चित्र आज अंबाजोगाईत पहायला मिळाले. शहर व परिसरात मंगळवारी ( ता. ६ ) १६१ कोरोना बाधित आढळून आले. दररोज करोना रुग्णांची व मृतांची संख्या वाढत असल्याने स्मशानात देखील जागा अपुरी पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मांडवा मार्गावरील पालिकेच्या स्मशानभुमित एकाच वेळी तब्बल आठ मृत करोना रुग्णांवर सामुहिक अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोरोनाने राज्यासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना विळखा घातला आहे. कोरोनाची दुसरी लाट ही अधिक घातक आणि जीवघेणी असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. रुग्णसंख्या आणि मृत्यूदर वेगाने वाढत असल्याने कोरोनाची साखळी कशी तोडायची असा प्रश्न सरकार व प्रशासनाला देखील पडला आहे. बीड जिल्ह्यात देखील कोरोना रुग्णांचे व मृतांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये दररोज शंभरच्या वर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. येथील वैयकाय महाविद्यालयाच्या कोविड केअर सेंटरमधील सात व लोखंडी सावरगावच्या कोविड केअर सेंटरमधील एक अशा एकूण आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.

या सर्व कोरोना बाधित मृत रुग्णांच्या पार्थिवावर नगर पालिका प्रशासनाने मांडवा रोडवरील स्मशानभूमीत एकाच सरणावर सामुहिक अंत्यसंस्कार केले. स्वामी रामानंद तीर्थ वैयकीय महाविद्यालय व लोखंडी सावरगावच्या कोरोना केंद्रात केज, धारूर, गंगाखेड, परळी 'माजलगाव, सोनपेठ या तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी येतात. त्यातील अनेक रुग्णांना मधुमेह , उच्च रक्तदाब, श्वसनाचे विकार पूर्वीपासून असतात.  वाढते वय आणि इतर आजारांमुळे वृद्ध रुग्णांचे दगावण्याचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. 

काही रुग्ण कोरोना सारख्या महामारीकडे दुर्लक्ष करतात व संसर्ग वाढल्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतात.  परिणामी मृत्यूंची संख्या वाढत आहे. तालुक्यात चार दिवसात पाचशेपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. मात्र अद्यापही अनेकजण निष्काळजीपणाने वागतांना दिसत आहेत.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com