मराठवाडा वाॅटरग्रीड होणारच; पैठणपासून सुरूवात, २८५ कोटींच्या खर्चास मंजुरी..

भाजप व तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी राज्य सरकारवर तोंडसुख घेत ही योजना गुंडाळल्याचा आरोप केला होता.
Marathwada Water Grid News Aurangabad
Marathwada Water Grid News Aurangabad

औरंगाबाद ः मराठवाड्यातील तीव्र पाणी टंचाई दूर करून ग्रामीण भागात शुद्ध पिण्याचे पाणी पोचवण्याच्या उद्देशाने तत्कालीन भाजप सरकारने आणलेली मराठवाडा वाॅटरग्रीड योजना सुरूच राहणार आहे. महाविकास आघाडी सरकारने ही योजना टप्याटप्याने राबवण्याचे आश्वासन दिले होते. (Marathwada will be a water grid; Starting from Paithan, sanction of expenditure of Rs. 285 crores) आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मराठवाडा वाॅटग्रीडच्या कामाला पैठणच्या जायकवाडी धरणापासून सुरू करण्यास व त्यासाठीच्या २८५ कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

पैठणनंतर वैजापूर, गंगापूर आणि त्यांनतर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात या योजनेच्या कामाला सुरूवात केली जाणार आहे. ( Marathwada Water Grid Project) राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर फडणवीस सरकारमधील अनेक खर्चिक योजनांना ब्रेक लावण्यात आला होता. (CM Uddhav Tahckeray) त्यात मराठवाडा वाॅटरग्रीड या महत्वाकांक्षी योजनेचा देखील समावेश होता.

यावरून भाजप व तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी राज्य सरकारवर तोंडसुख घेत ही योजना गुंडाळल्याचा आरोप केला होता. तर सरकारकडून मात्र योजना गुंडाळलेली नाही, तर तात्पुर्ती स्थगित करण्यात आल्याचे सांगितले जात होते. यापुर्वी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत देखील मराठवाडा वाॅटरग्रीड योजने संदर्भात चर्चा झाली होती. तेव्हा टप्याटप्याने ही योजना राबवण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

अखेर आज या संदर्भात निर्णय घेऊन पहिल्या टप्यातील कामासाठी निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला. मराठवाडा विभागातील पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठीचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्रीमंडळाने यासाठीच्या २८५ कोटीच्या खर्चाला देखील मान्यता दिली.

याशिवाय औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर या तालुक्यासह  बीड, उस्मानाबाद, लातूर आणि उर्वरित भागात ही ग्रीड योजना टप्याटप्याने राबवण्यावर मंत्रीमंडळाने शिक्कामोर्तब केले. एकूण पाण्याची उपलब्धता व निधीच्या तरतूदीनुसार मंत्रीमंडळासमोर  वेळोवेळी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही या बैठकीत देण्यात आले. त्याचप्रमाणे पश्चिम वाहिनी नद्यांमधून पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याबाबत जलसंपदा विभागाच्या वतीने अभ्यास अहवाल (सुसाध्यता) सादर करण्यात येणार आहे.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com